Satara Latest Marathi News 
सातारा

सदाशिवगड उद्यापासून तीन दिवस बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे आदेश

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड येथील श्री सदाशिव मंदिर उद्यापासून (ता. 10) शुक्रवारदरम्यान (ता. 12) बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासने हा आदेश दिला आहे. 

सदाशिवगड परिसरात व श्री सदाशिव मंदिरात प्रशासनाकडून मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. गडावरील श्री सदाशिव मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याशी जोडण्यात आले आहेत. त्याद्वारे शहर पोलिस ठाण्यातून मंदिरासह मंदिर परिसरावर 24 तास लक्ष ठेवले जाणार आहे. गडावर जाणाऱ्या वनवासमाची, राजमाची, बाबरमाची, तसेच हजारमाची मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात असेल.

याशिवाय गडावर, मंदिर परिसरात पोलिस तैनात असणार आहेत, तरीही शासनाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या, तसेच गडावर जाणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाणार आहे, असे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून 5,737 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू

Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT