Satara Latest Marathi News 
सातारा

आता कचऱ्याचे नो टेन्शन! प्लॅस्टिकच्या बाटल्यांत कचरा भरा अन् लावा विल्हेवाट; 'स्वच्छेंदी'ची नवी क्‍लुप्ती

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरातील "स्वच्छेंदी ग्रुप'ने मध्यवस्तीत असणाऱ्या चारभिंती व परिसरातील कचरा जमा केला. "मी स्वच्छेंदी तुम्ही पण, स्वच्छेंदी राहा'चा नारा देत या ग्रुपमधील तरुण-तरुणींनी 20 पोती कचरा गोळा केला. 

शहर व परिसरात अनेक पर्यटनस्थळे असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत अजिंक्‍यतारा, महादरे तलाव, यवतेश्‍वर पठार व इतर परिसरातील कचरा संकलन केला आहे. दर रविवारी शहर व परिसरातील एका ठिकाणची साफसफाई ग्रुपमधील सदस्य करतात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात काचा, बाटल्या व इतर साहित्य गोळा केले जाते.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आम्ही विविध ठिकाणचा कचरा संकलन केल्यानंतर सुरुवातीला त्यांचे रिसायकलिंग करत होतो. मात्र, ही पध्दत खूप किचकट असल्याने गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता नवीन क्‍लुप्ती शोधून काढली आहे. एकत्रित केलेला कचरा प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून त्या बाटल्यांच्या माध्यमातून पाण्याचे हौद, बसण्यासाठी कट्टे तयार केले जात असल्याचे ग्रुपमधील अर्थव कुलकर्णी यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT