सातारा

गुन्हा दाखल करण्याची धमकी देत युवकास लुटले; तिघांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची धमकी देत मोरावळे (ता. जावली) येथील युवकाचे अपहरण करत त्याच्याकडून 50 हजार उकळल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात काल तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. किशोर बाळासोा कांबळे (रा. एलआयसी कॉलनी, शाहूपुरी) असे संशयिताचे नाव असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

मोरावळे (ता. जावली) येथे वैभव अनंत गोळे (वय 20) हा युवक राहण्यास आहे. तो शाहूपुरी येथील एका औषध विक्रेत्याकडे कामास आहे. त्याचठिकाणी एक महिला सुध्दा कामास आहे. कामादरम्यान त्या दोघांची ओळख झाली. यानंतर काही दिवसांनी एकमेकांशी व्हॉटसऍपवर चॅटींग सुरु केले. याची माहिती किशोर कांबळे याला मिळाली. त्याने गोळे याला ता. 20 नोव्हेंबर रोजी शाहूपुरी चौकात बोलावून घेतले. याठिकाणी आलेल्या गोळेला अल्टो कारमध्ये बसवून राधिका रोडवरील गणपती विसर्जन तलावाजवळ नेण्यात आले. याठिकाणी कांबळे त्याच्या दोन साथीदारांनी गोळेला मारहाण करत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. गुन्हा दाखल करण्याची धमकी देत कांबळे व त्याच्या साथीदारांनी गोळेकडून वेळोवेळी 45 हजार रुपये उकळले. 

ता. 4 डिसेंबर रोजी कांबळे व त्याच्या साथीदारांनी पुन्हा गोळेला बोलावून घेत कारमधून राधिका रोड परिसरात नेले. याठिकाणी काठीने मारहाण करत कांबळेने गोळेकडे असणारा 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल हॅंडसेट काढून घेतला. वारंवार होणाऱ्या मारहाणीस कंटाळून गोळेने काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची तक्रार नोंदवली. घटनास्थळाची पाहणी करत तपासाबाबत सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. याचा तपास सहाय्यक निरीक्षक शितोळे हे करीत आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT