सातारा

मोदी सरकारविरोधात साताऱ्यात शिवसैनिकांची सायकल सुसाट; इंधनवाढीचा नोंदविला निषेध

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : पोवई नाका येथे केंद्र सरकारच्या सततच्या पेट्रोल, डिझेल, गॅस भाववाढीविरोधात शहर शिवसेनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारने भाववाढ कमी न केल्यास आगामी काळात सरकारला मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही सेनेच्या वतीने देण्यात आला.

गेल्या एक महिन्यांपासून केंद्र सरकार छुप्या पद्धतीने रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये १५, २० पैसे अशी वाढ करून लोकांच्या नजरेमध्ये धूळ फेकून सतत दरवाढ करत आहे. गेल्या महिन्याभरात जवळ-जवळ पाच ते सहा रुपये दरवाढ झालेली आहे, ही बाब जनतेच्या लक्षात येणार नाही. अशा पद्धतीने भाववाढ केंद्र सरकार करत आहे. कोरोनाच्या काळात नागरिक आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये वडाप वाहतूक, शेतीसाठी लागणारे डिझेल, तसेच भाजीपाला व इतर ट्रान्सपोर्ट वाहतूक या दरांमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली असून रिक्षा, टॅक्सी, टेम्पो वाहतूकदारांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. एसटी महामंडळ सुद्धा डबघाईला आल्याचे चित्र शहरात पहायला मिळत असून यावरती त्वरित तोडगा काढण्याची मागणीही सेनेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, सेनेने मोदी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी सातारा शहर प्रमुख निमिष शहा यांनी सायकल चालवून निदर्शने केली.

या निदर्शनात शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, अतिश ननावरे, ऍड. शिरीष कुमार, मारुती वाघमारे, सयाजी शिंदे, जितेंद्र वाघंबरे, सुनील भोसले, नंदू केसरकर, महिला संघटिका मीनल शहा, भगवानराव शेवडे, सुनील भालेराव, राजेंद्र नाईक, विशाल साळुंखे, अमित देशपांडे, प्रदीप दप्तरदार, सुभाष पवार, मोहित शहा, कांचन डांगरे, जितेंद्र महाडिक, सचिन शिंदे, योगेश शेलार, सुमित नाईक आदींसह सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT