Satara Latest Marathi News 
सातारा

टपरीचालकांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन; सेनेचा प्रशासनाला इशारा

उमेश बांबरे

सातारा : शहरात विविध भागांत बेकायदेशीर टपऱ्या उभारल्या जात आहेत. संबंधित टपरीचालकांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, तसेच शहर शिवसेनेला साताऱ्यात 500 टपऱ्या टाकण्यास कायदेशीर परवानगी द्यावी, असे निवेदन शिवसेनेच्या शहर शाखेच्या वतीने शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही देण्यात आले आहे. 

शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौकांतही बेकायदेशीर खोकी उभारून अनधिकृत व्यवसाय केले जात आहेत. शहर शिवसेनेच्या वतीने निवेदने देऊनही प्रशासन त्यांच्यावर ठोस कारवाई करत नाही. राजवाडा परिसर, मोती चौक ते 501 पाटी, बस स्थानक परिसर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा परिषद परिसर, राधिका रस्ता, हुतात्मा चौक परिसर, मंगळवार तळे असा एकही रस्ता बेकायदेशीर टपऱ्याविना राहिलेला नाही. मोती चौक ते 501 पाटी या अंतरात दुकानदार, व्यावसायिक दुकानाबाहेर माल लावतात. दुचाक्‍या लावायलाही जागा उरत नाही. वाहतुकीची कोंडी होते. 

नागरिकांना अनेक त्रासांना तोंड द्यावे लागते. फुटपाथवर अतिक्रमणे वाढली आहेत. काही दुकानदार दुकानाबाहेर हातगाडी लावावयास परवानगी देऊन त्यांच्याकडून भाडे वसूल करतात. असे गाडे वाहतुकीला अडथळा ठरतात. खणआळीतही हिच अवस्था आहे. संबंधित अतिक्रमणे येत्या 15 दिवसांत काढली जावीत. ज्या खोकीधारकांची पालिकेकडे नोंद आहे, त्यांची योग्य व्यवस्था लावावी. मोती चौक भवानी पेठ येथे एका इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम झाले आहे. या सर्वांची दखल तातडीने घेतली जावी व संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking: गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Clerk Bribery Viral Video : निवृत्त महिलेकडून 45 हजारांची लाच घेताना बडा लिपिक कॅमेऱ्यात कैद; नोटा मोजतानाचा तोरा तर पाहा, आरोग्य विभागात खळबळ

Whatsapp New Feature : तुमच्या पालकांना कळणार तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये काय करताय; आलं Parental Control फीचर, कसं वापरायचं पाहा

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

SCROLL FOR NEXT