कऱ्हाड (जि. सातारा) : कार्वे (ता. कऱ्हाड) येथील जवान वैभव थोरात यांना केंद्रीय रिझर्व्ह पोलिस फोर्सच्या 82 व्या वर्धापनदिनी दिल्लीत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
जम्मू-काश्मीर येथे उरी सीमेवर कर्तव्य बजावताना सीआरपीएफमधील जवान वैभव यांनी आतंकवाद्यांना कंठस्नान घालून पराक्रमाची शर्थ गाजवली. भारत-पाकिस्तानमधील सर्वांत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या उरी बॉर्डरवर प्राणाची पर्वा न करता युनिटमधील जवानांसोबत मध्यरात्री घुसखोरी करण्याच्या प्रयत्नातील आतंकवाद्यांना गोळ्या घालून ठार केले.
वैभव यांना नित्यानंद राय यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे वडील लान्सनायक (कै.) शंकर रामराव थोरात यांच्याप्रमाणेच देशसेवेची ओढ असल्याने ते 2005 मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. तेव्हापासून ते देशसेवा करत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.