सातारा

केंद्र शासनाकडून जांबाज पोलिस अधीक्षकांचा विशेष पदकाने सन्मान; गडचिरोली, छत्तीसगडच्या कामगिरीची दखल

प्रशांत घाडगे

सातारा : गडचिरोली येथे केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल केंद्र शासनाने इंटेलिजेन्स मेडल, तर राज्य शासनाने विशेष सेवा पदक देऊन पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना सन्मानित केले आहे. 

बन्सल यांनी 13 ऑगस्ट 2018 मध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून गडचिरोलीमध्ये पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी दक्षिण गडचिरोली या दुर्गम व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात नागरिकांचा विश्‍वास संपादन करून गोपनीय खबऱ्यांचे जाळे निर्माण केले. त्यामुळे गडचिरोली, तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातूनही गोपनीय माहिती मिळण्यास मदत झाली. त्यामुळे सी-60 पथकांना गडचिरोली, छत्तीसगडच्या सीमावर्ती नक्षलविरोधी मोहिमा यशस्वीरीत्या राबविता आल्या. 

या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना इंटेलिजेन्स मेडल जाहीर केले. त्यांच्यासह राज्यातील सात पोलिस अधिकारी व अंमलदार यांना हा सन्मान मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांनी गडचिरोली भागात सलग दोन वर्ष सेवा करून उल्लेखनीय काम केल्याबद्दल शासनाने त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. पोलिस महासंचालकांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT