Satara News The survival of the riverside people is in fear of floodskoyana krishna karad  sakal
सातारा

Satara News: नदीकाठच्या लोकांचे जगणेच पुराच्या भीतीच्या छायेत !

Karad News : २२२ पेक्षाही जास्त कुटुंबांचे पुनर्वसन झालेले नाही. १५ वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला, तरी अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेने काहींचे स्थलांतर केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सचिन शिंदे : सकाळ वृत्तसेवा

Latest Maharashtra News : कोयना- कृष्णा नद्यांचे पाणी वाढत महापुराच्या दिशेने जाते. तसतशी त्या दोन्ही नदीकाठावरील शहरी भागातील कुटुंबांतील अस्वस्थता वाढते. शहरातील तब्बल २२२ पेक्षाही जास्त कुटुंबांचे पुनर्वसन झालेले नाही. १५ वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला, तरी अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेने काहींचे स्थलांतर केले आहे. मात्र, तेही स्थलांतर अर्धवटच स्थितीत आहे.

पूर काळातली भीती कायम

संततधार पाऊस व कोयना धरणातून नदीत पाणी सोडले, की शहरात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पालिकेच्या मदतीने पूर काळात तब्बल २२२ हून अधिक कुटुंबांचे नेहमीच स्थलांतर करावे लागते. महापूर आला, की ती कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित होतात. त्यांच्या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था पालिकेच्या शाळांच्या इमारतीसह कृष्णाबाई मंगल कार्यालय व पालकर शाळेत केली जाते.

त्यात तब्बल सुमारे ७९० हून अधिक लोकांचे स्थलांतर होते. पूरस्थितीत पालिका मदत करते. मात्र, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नदीकाठावरील नागरिक पुराची भीती डोक्यावर घेऊन जगतात. त्या कुटुंबांची भीती संपणार तरी कधी, हाच खरा प्रश्न आहे. घरकाम करणाऱ्या गवंडी कामासह रोजंदारीवरील काम करणाऱ्यांचे वास्तव्य त्या वस्तीत आहे.

छोट्या खोल्यांमुळे गैरसोय

प्रत्येक वर्षी पूर आला, की धावपळ उडते. १५ वर्षांपासून याच स्थितीशी हे लोक सामना करत आहेत. त्या वेळी पालिकेने घरकुलासाठी अर्ज भरून घेतले होते. त्याबाबत काहीही निर्णय नाही. काही कुटुंबांना बारा डबरे परिसरात खोल्या बांधून दिल्या. कुटुंब मोठे अन् दिलेल्या खोल्या लहान झाल्या आहेत. त्यामुळे स्थलांतरही अपुरे ठरते आहे.

तिथे राहण्यास गेलेल्यांमध्ये दोन ते चार मुले आहेत, त्यांनी काय करायचे अशा प्रश्न आहे. घरातील आई- वडिलांनी कोणासोबत राहायचे हाच प्रश्न आहे. त्यामुळे तेथील दहा बाय दहाच्या खोल्यांची जागा पुरणार नसल्याने स्थलांतरित होणाऱ्यांपैकी कोणीही तिकडे गेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT