Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

धक्कादायक! पेट्रोल विहिरीत गेल्याने जलचर मुत्युमुखी; सासवडात पेट्रोल पाइपलाइन फोडून चोरीचा प्रयत्न

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : पुणे ते सोलापूर दरम्यान गेलेली पेट्रोल पाइपलाइन सासवड (ता. फलटण) येथे फोडून पेट्रोल चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. परंतु, या पाइपलाइनमधून हजारो लिटर पेट्रोल वाहून गेल्याने परिसरातील विहिरी पेट्रोलने भरल्याने मासे, बेडूक, साप मृत्युमुखी पडले, तर शेतातही पेट्रोल पसरल्याने शेतपिके जळून गेली आहेत. 

परिसरात पेट्रोल पसरल्याने व ते ज्वलनशील असल्याने कुठलीही अनुचित घटना घडणार तर नाही ना? या भीतीच्या छायेखाली ग्रामस्थ आहेत. दरम्यान, या परिसरातील जलस्त्रोतांमध्येही पेट्रोल मिसळले गेल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. सासवडपासून दोन किलोमीटर अंतरावर खडकमाळ शिवारात पाइपलाइनमधून पेट्रोल मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागल्याने संबंधित कंपनी व लोणंद पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यावेळी शेतातील उसाच्या सऱ्या, ज्वारीच्या शेतात मोठ्या प्रमाणात पेट्रोल साठल्याने ज्वारी, मका, ऊस आदी पिके करपून गेली होती. गळतीनंतर कंपनीने टॅंकरद्वारे पेट्रोल भरून नेण्यास सुरवात केली. परिसरातील दोन विहिरीत पेट्रोल साठल्याने विहिरीतील मासे, बेडूक, साप आदी जलचर मृत्युमुखी पडले आहेत. 

ही पाइपलाइन चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी फोडली की गळती लागली, याबाबत कुठलीही माहिती लोणंद पोलिसांकडून मिळालेली नाही. याबाबत तक्रार दाखल होऊनही त्याची माहिती देण्यात टाळाटाळा केली गेली. या गळतीनंतर घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर परिसरात पेट्रोलचा तीव्र वास पसरला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळ व परिसरात येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. विहिरीमध्ये साठलेले पाणीमिश्रित पेट्रोल टॅंकरमध्ये भरण्याचे काम सुरू आहे. विहिरीमध्ये पाण्यावर चार इंच पेट्रोल थर आल्याने परिसरातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे शेतकरी व जनावरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT