सातारा

रिक्षा जेथे थांबते, तोच होतो थांबा; कऱ्हाडात रिक्षाचालकांची अरेरावी!

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरात जेथे रिक्षा थांबते, तो थांबा व जेथून रिक्षा चालते, तो रस्ता अशी अवस्था झाली आहे. शहरातील लोकसंख्येच्या मानाने येथे असलेल्या रिक्षांची संख्या अधिक आहे. शहराबाहेरूनही येथे रिक्षा येतात, त्याचेही प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रिक्षा थांबे किती व त्या रिक्षा थांब्यावर किती रिक्षा थांबवायच्या, याची माहिती कोणालाच नाही. पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभाग व पालिकाही त्यापासून अनभिज्ञ आहे. त्यामुळे शहरात रिक्षा थांब्यांची संख्या वाढते आहे. रिक्षाचालकांच्या मनात आले की तो थांबा होतो, अशी अवस्था झाली आहे. त्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी पालिका व पोलिस राबवणाऱ्या वाहतूक आराखड्यात तरतूद केली. मात्र, अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. 

येथील चौकात सलग दोन रिक्षा थांबल्या होत्या. त्या रिक्षा जेथे थांबल्या होत्या, तो रस्ता किमान 20 टक्के त्या रिक्षाने व्यापला होता. त्यामुळे वाहतूक कोंडीही होत होती. त्याची जाणीव असतानाही ते रिक्षाचालक त्या रिक्षा हलवत नव्हते. कोणी विचारण्यास गेले की, हा रिक्षास्टॉप आहे, कळत नाही का, अशी उत्तरे देऊन विचारणाऱ्याला उलट उत्तरे दिली जात होती. वास्तविक रिक्षा जेथे थांबली होती, तो अधिकृत रिक्षा थांबा नव्हता किंवा नेहमी रिक्षा जेथे थांबतात, तो चौकही नव्हता. मात्र, रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे अनेक प्रश्न सध्या तरी शहरात गाजत आहेत. त्यात रिक्षाच्या थांब्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शहर व परिसरात किमान 83 रिक्षा थांबे आहेत. त्यात शहरात 58 च्या आसपास रिक्षा थांबे अधिकृत असल्याचे सांगितले जाते. त्याबाबत ठोसपणे कोणीच काही सांगताना दिसत नाही. परिणामी रिक्षा थांब्यांची संख्या वाढलेली दिसते. म्हणजे जेथे रिक्षा थांबते, तो त्यांचा थांबा होतो. बस स्थानकावर एखादाच रिक्षा थांबा मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात चार ते पाच थांबे आहेत. सिग्नलही त्यांनी सोडलेला नाही. वास्तविक सिग्नलपासून शंभर फुटांवर कोणीही नसावे, असा नियम आहे. मात्र, तो नियम येथे ढाब्यावर बसवलेला दिसतो. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

SCROLL FOR NEXT