सातारा

महाबळेश्वरात जखमी जंगली कबुतराला राजस्थानच्या पर्यटकाकडून जीवदान

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या राजस्थान येथील मेरठ हॉटेल फूड स्टुडिओचे व्यवस्थापक आणि प्राणीमित्र दिनेश सिंग यांनी प्रवास करताना रस्त्यामध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या जंगली कबुतराला जीवदान दिले.
 
दिनेश सिंग हे महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटनासाठी आले आहेत. त्यांना महाबळेश्वर प्रवासात एक जंगली कबूतर जखमी अवस्थेत सापडले. श्री. सिंग यांनी लागलीच या कबुतराला पकडून त्याला आपल्या गाडीत घेतले व लगेच माहिती घेऊन महाबळेश्वर ट्रेकर्सच्या अध्यक्ष अनिल केलगणे यांना संपर्क केला व त्यांना बोलावून घटनेची माहिती दिली. श्री. केलगाने यांनी लगेच हे जखमी कबूतर घेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार करून बरे झाल्याचे खात्री करून त्या कबुतराला जंगलात सुरक्षितपणे सोडून दिले. याबद्दल दिनेश सिंग व अनिल केलगने या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT