Satara Latest Marathi News 
सातारा

भारतीय मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर फलटणच्या वैशाली शिंदे; रेल्वेमंत्री गोयलांकडून नियुक्ती

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण शहरातील आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका वैशाली शिंदे यांची भारतीय मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली. ही जबाबदारी आपण खंबीरपणे पेलू, अशी प्रतिक्रिया वैशाली शिंदे यांनी निवडीनंतर व्यक्त केली. 

भारत सरकारतर्फे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे सल्लागार समितीवर वैशाली शिंदे यांची नियुक्ती केली. त्यांचे कार्यक्षेत्र भारतीय मध्य रेल्वे असेल. मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यातील काही प्रदेशांचा समावेश आहे.

सामान्य कुटुंबातील व्यक्तीला चार राज्यांत रेल्वे विभागात सल्लागार समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीने सर्वसामान्य लोकांनाही मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती सत्यात उतरवण्याचा हक्क आहे, हे अधोरेखित झाल्याचे सौ. शिंदे यांनी स्पष्ट केले. नवीन जबाबदाऱ्या आणि नव्या क्षेत्रातील आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा नेहमीच प्रेरणादायी ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT