Leopard Sakal
सातारा

Leopard : बिबट्याच्या धास्तीने वसंतगडकरांची उडाली झोप

वसंतगड येथे बिबट्याने रात्रभर धुमाकूळ घातला. भरवस्तीत बिबट्या घुसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली

- हेमंत पवार

कराड : वसंतगड येथे बिबट्याने रात्रभर धुमाकूळ घातला. भरवस्तीत बिबट्या घुसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली. रात्रीच्या वेळी तीन तासात बिबट्याने चारवेळा दर्शन दिले. या काळात लोकांच्या समोरून एक कुत्री व तिचे पिल्लूही बिबट्याने नेले. त्यामुळे वसंतगड येथील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुधवारी रात्री दत्तात्रय विठ्ठल जामदार यांच्या घरासमोर रात्री 9 ते 12 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिले. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी जामदार यांच्या घराकडे धाव घेतली. भाऊसो वाळूंज यांच्या शेतात बिबट्या बराच वेळ थांबलेला होता. बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

वसंतगड येथे गेल्या काही दिवसापासून बिबट्या वारंवार दिसत आहे. गावातील अनेक भटकी कुत्री तसेच बकरीही बिबट्याने फस्त केली आहेत. रात्री बिबट्या फिरत असलेल्या परिसरात पायाचे ठसे उठलेले आहेत. भरवस्तीत बिबट्याच्या एंट्रीने वसंतगडकर चांगलेच धास्तावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT