Satara Latest Marathi News 
सातारा

'I LOVE KARAD' नंतर शहराच्या सौंदर्यात आणखी भर; टाकाऊपासून तयार झालेली शिल्पे ठरताहेत आकर्षण

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणसह माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यांत भर पडते आहे. वर्षभरापूर्वी पालिकेने "वेस्ट टू बेस्ट'चा नारा दिला. त्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अव्वल राहत बाजी मारली आहे. रोजचे काम आटोपून पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी शहरात सुंदर आरास उभी करत आहेत. त्यांना तो छंदच जडला आहे. त्या सगळ्या कलाकृती नागरिकांसाठी खुल्या असून, आकर्षितही करत आहेत. त्यामुळे "वेस्ट टू बेस्ट'मध्ये पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारीच "बेस्ट' ठरले आहेत. 

टाकाऊ साहित्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कलाकुसरीतून कऱ्हाडला जणू कचऱ्यालाच सुंदर आकार मिळतो आहे. हे कर्मचारी दैनंदिन कामातून वेळ काढून कलाकृती साकारत आहेत. कर्मचाऱ्यांनी खराब, टाकाऊ वस्तूंपासून मासा, हत्ती, फुलपाखरू, पिगी बॅग, जीन्स पॅन्टचा सुंदर बगीचा, टाकाऊपासून मोठे फुलपाखरू, मोर, पक्ष्यांच्या घरट्यांसह झाडे लावण्यासाठी फाटक्‍या पॅन्टच्या कुंड्या तयार केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी गतवर्षी हत्ती, तर यंदा मासा, कासवाचे शिल्प साकारले आहे. त्यासाठी भंगार, प्लॅस्टिकचे डबे, बाटल्या, खराब लोखंडी साहित्याचा खासकरून वापर केला आहे. 

साताऱ्यातील नायगावात सावित्रीसृष्टी उभारण्याचा बुलढाण्यातील नागरिकांचा निर्धार

कामगारांच्या कलाकृतीतून वेगवेगळ्या साकारणाऱ्या कलाकृतीत सेल्फी काढण्याचीही सोय आहे. कासवावर थेट बसण्याची व्यवस्था आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य विभागाचे सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदेंसह त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळते. वेस्ट टू बेस्टसाठी मुकादम मारुती काटरे यांच्यासह सर्व मुकादमही कलाकृती साकारत असतात. त्यात मुकादम शेखर लाड व संजय चावरे, प्रशांत वाडीकर, सोनू चव्हाण, अभिषेक लाड, अक्षय चावरे, प्रकाश लाड, उमेश चावरे, महेश चव्हाण आदींनी पत्रे, पाइप, लोखंडी गजाचा वापर करून खास कासव तयार केले आहे. ते सध्या आकर्षणाचे केंद्र आहे. 

MPSC चा अभ्यास करताना या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या; परीक्षा होईल एकदम सोपी..

रोजचे काम उरकून कलाकृती 

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत साकारलेल्या विविध चित्रांचे नागरिकांत आकर्षण आहे. मात्र, त्यासाठी रोजची शहरातील स्वच्छतेची कामे आटोपून आरोग्य कर्मचारी त्या कलाकृती साकारत आहेत. त्यामुळे त्याला मिळणारी दाद त्यांना बळ देवून जाते. त्यामुळे कलाकृती करणे त्यांच्या अंगवळणी पडले आहे. पपिंग स्टेशनमध्ये सजावटीसह बगीचा, छोटे कारंजेही त्यांनी साकारले आहेत. 

स्वयंपाक झाल्यानंतर किचन साफसफाईचा वाचवा अशा पद्धतीने वेऴ

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT