Satara Latest Marathi News 
सातारा

उंब्रजमध्ये महामार्गावर चक्क वाहनतळ; पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड ते पुणे जाणाऱ्या लेनवर राजरोस अवैध वाहतूक सुरू आहे. महामार्गावरच वाहने उभी करून सर्रास प्रवासी भरत आहेत. परिणामी राष्ट्रीय महामार्गावर थांबलेले प्रवासी व वाहनांचे लहान-मोठे अपघात नित्याचे झाले असून, याकडे पोलिस प्रशासन कधी लक्ष देणार? याबाबत नागरिकांच्यात चर्चा आहे. महामार्गावर वाहनधारकांनी चक्क वाहनतळच थाटल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. 

उंब्रज हे मुख्य बाजारपेठेचे व राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीचे ठिकाण असून, शैक्षणिकदृष्ट्या राज्य मार्गांना जोडणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कायमच महामार्गावर वर्दळ सुरू असते. येथील अवैध वाहतुकीमुळे महामार्गावर अनेक समस्या निर्माण होत आहेत. कऱ्हाड ते सातारा जाणाऱ्या लेनवर मार्केट कमिटीसमोर महामार्गावर पुण्याला जाणारी खासगी वाहने स्वमालकीचा रस्ता असल्यासारखे कुठेही कशीही सकाळी 6 ते 11 या कालावधीत अस्ताव्यस्त उभी असतात. खासगी वाहने महामार्गाच्या दुतर्फा उभे असल्यामुळे महामंडळाच्या बस थांबत नाहीत. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, महिलांची धावपळ होऊन नाईलाजाने त्यांना खासगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागतो. 

सातारा ते पुणे प्रवासी वाहतूक करताना जादा "ट्रिप' मारण्याचा व प्रवासी मिळवण्याच्या चालकांचा अट्टाहासामुळे गाडीचे वेग अमर्याद वाढत असून, प्रवासी मिळविण्यासाठी गाड्यांची पळवापळवी ही बाब महामार्गावर नित्याची झाली आहे. यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. मात्र, याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अवैध वाहतुकीला बळ मिळत असून, वाहतूक शाखेचे कर्मचारी शोभेची बाहुली झाल्यासारखे काम करीत असल्याचे मत उंब्रजमधील नागरिक व्यक्त करीत आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीचा खेळ थांबणार कधी? एखादा मोठा अपघात झाल्यानंतर पोलिस प्रशासन व महामार्ग सुरक्षा विभागास जाग येणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. 

कारवाई थंडावल्याने वाहनधारक बिनधास्त 

दरम्यान, मध्यंतरी पोलिस प्रशासनाने महामार्गावरील अवैध वाहतुकीविषयी कठोर पावले उचलली होती. परंतु, सद्य:परिस्थितीमध्ये ही कारवाई थंडावली असल्याने वाहनधारक बिनधास्त झाले आहेत. तेव्हा संबंधित प्रशासन कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT