Satara Latest Marathi News 
सातारा

चिंताजनक! दापोलीत लग्नाला गेलेल्या 80 जणांपैकी 13 जण बाधित; विहेत आठ दिवस 'लॉकडाउन'

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : विहे वसाहत येथून दापोली येथे लग्नाला गेलेल्या सुमारे 80 जणांपैकी 13 जण कोरोनाबाधित झाले आहेत. इतरांचे स्वॅब टेस्टिंगसाठी घेतले असून, प्रशासन व ग्राम दक्षता समितीकडून आठ दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

विहे येथील दोन ट्रॅव्हल्स दापोली येथे लग्नासाठी गेल्या होत्या. त्यातून 70 ते 80 जण प्रवास करत होते. 27 फेब्रुवारीला लग्न करून घरी आल्यानंतर त्यातील एक जणास चार मार्चला त्रास जाणवू लागल्याने त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील अन्य लोकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. यात 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या बाधितांच्या संपर्कातील किराणा दुकान, हॉटेलवर जाणाऱ्या सुमारे 71 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. त्यांचे स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवले आहेत. तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी विहे गावात जाऊन गावकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले. 

चिंताजनक! कऱ्हाडात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; आरोग्य विभागाकडून जोरदार हालचाली 

आरोग्य विभागास ट्रॅव्हल्समधील सर्व नागरिकांचे स्वॅब घेण्याच्या सूचना केल्या असून, विहे ग्रामदक्षता समितीने 20 मार्चपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तहसीलदार टोपे म्हणाले, की 27 फेब्रुवारी रोजी दापोली येथे लग्नाला गेलेल्या दोन ट्रॅव्हल्समधील नागरिकांची कोरोना टेस्ट केली आहे. त्यात 13 जण बाधित असून, अन्य 70 ते 80 जणांची टेस्ट केली आहे. त्याचे रिपोर्ट येत्या दोन दिवसांत येतील. सर्व परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. सध्या तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. 

स्वीडनमध्ये 1300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय गोष्टीचा शोध; Gold Foil मध्ये दिसली मिठी मारणारी जोडपी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT