सातारा

टॅंकरने पाणीपुरवठ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : येथे कऱ्हाड-चिपळूण रस्ता रुंदीकरणामुळे टॅंकरने पाणीपुरवठा होत असून, त्यामध्ये नागरिकांची झुंबड उडत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. येथील कऱ्हाड-चिपळूण राज्य महामार्गाचे काम सुरू झाल्याने मल्हारपेठमध्ये गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

मुख्य बाजारपेठ, पवार आळी, पानस्करवाडी, सोंडेवाडी, जयमल्हारनगर या भागात गेल्या तीन दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामपंचायतीकडून उपाययोजना सुरू असल्या तरी एवढ्या मोठ्या गावाला पाणी देताना ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यात रविवारी रात्री रस्त्याच्या कामात ग्रामपंचायतीसमोरील मुख्य पाइपलाइन ग्रामस्थांना सूचना न देता तोडल्याने गावात पाण्याची मोठी टंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दोन वेळा पाणीपुरवठा करणारी मल्हारपेठची ग्रामपंचायत असल्याने नागरिकांना यांची सवय लागली आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाल्याने गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. 

कोरोनाच्या संकटात पाण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचे चित्र मल्हारपेठमध्ये दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या चार महिन्यांत कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाययोजना केल्या. वेळोवेळी लाउडस्पीकरवरून जनजागृती केली. मात्र, गेल्या चार दिवसांत पाण्यासाठी नागरिकांना कोरोनाचा विसर पडला की काय, अशी स्थिती मल्हारपेठमध्ये पाहायला मिळाली. ग्रामंपचायतीने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT