Satara Latest Marathi News 
सातारा

Don’t Worry! माणदेशात प्रथमच मार्चमध्ये मुबलक पाणी; बहुतांशी तलावांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : सलग दोन वर्षे माण तालुक्‍यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे सध्या माणमध्ये समाधानकारक पाणी उपलब्ध आहे. मागील काही वर्षांचा आढावा घेतला असता प्रथमच मार्च महिन्यात माणमधील बहुतांशी पाणीसाठ्यांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणी शिल्लक आहे. 

दरवर्षी जानेवारी संपतानाच माणमध्ये पाणीटंचाईची चाहूल लागण्यास सुरुवात होते. एका-एका गावातून पाण्याच्या टॅंकरच्या मागणीची पत्रे पंचायत समितीत येऊ लागतात. फेब्रुवारीत वाढलेली उन्हाची तीव्रता पाणीपातळी वेगाने घटविण्यास सुरुवात करते. मार्च उजाडतानाच गावोगावी पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढून प्रशासनावर ताण येतो. यासोबतच जनावरांच्या छावण्यांची मागणीही जोर धरू लागते. या सर्व परिस्थितीमुळे मार्च महिन्यापासून माणमध्ये पाण्याची अतिशय गंभीर समस्या असते. 

मात्र, यावर्षी अजूनपर्यंत एकाही गावातून पाण्याच्या टॅंकरची मागणी प्रशासनाकडे करण्यात आलेली नाही. उत्तम पर्जन्यमान व त्याला मिळालेली जलसंधारणाच्या कामांची उत्कृष्ट जोड यामुळे यंदा माणमधील पाणीटंचाई दूर पळाली आहे. मोठ्या तलावांत निम्म्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. फक्त लोधवडे तलावातील पाणी शेतीसाठी सोडल्यामुळे त्या तलावात पाणी शिल्लक नाही. तर काही ठिकाणी सिमेंट बंधारे, पाझर तलावांमध्येही पाणी उपलब्ध आहे. यामुळे बळीराजा आनंदात आहे तर प्रशासनाला दुष्काळ निवारण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांपासून सुटका मिळाली आहे. भरपूर पाणी उपलब्ध असल्यामुळे सर्वत्र शिवारे फुलली आहेत. ज्वारी, गहू, कांदा काढणीची लगबग सुरू आहे. यासोबतच उन्हाळी कांदा, भुईमूग, भाजीपाला घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. 

माणदेशातील मध्यम-लघु प्रकल्पातील पाणीसाठा 

मध्यम-लघु प्रकल्प प्रकल्पीय पाणीसाठा आजचा पाणीसाठा टक्केवारी
आंधळी 7.43 5.08 68.37
राणंद 6.42 4.91 76.48 
जाशी 3.16 1.64 51.90 
पिंगळी 2.66 1.98 83.90 
ढाकणी 2.66 1.51 56.77 
गंगोती 1.36 0.68 50.00 
जांभूळणी 2.26 1.21 53.54 
महाबळेश्वरवाडी 1.50 0.78 52.00
मासाळवाडी 2.02 0.65 32. 18
लोधवडे 0.70 0.00 0.00 
       

(आकडेवारी दशलक्ष घनमीटरमध्ये) 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT