Satara Latest Marathi News 
सातारा

शाहूपुरीच्या अंगणी मार्चअखेर पाणी; वाढीव निधीमुळे योजनेच्या कामाला गती

गिरीश चव्हाण

सातारा : शाहूपुरी योजनेच्या वाढीव कामांसाठीचा निधी शासनाने दिल्याने प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. ही पाणी योजना मेअखेर पूर्ण करण्याचा चंग जीवन प्राधिकरण व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बांधल्याने वनहद्दीतील जलवाहिनीच्या रखडलेल्या कामाला गती आली आहे. 

शाहूपुरी व परिसराला जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. दिवसेंदिवस त्याठिकाणची लोकसंख्या वाढू लागल्याने या भागासाठी स्वतंत्र पाणी योजना तयार करण्यासाठीचा प्रस्ताव शाहूपुरी ग्रामपंचायतीने तयार केला होता. प्रस्तावानुसार 42 कोटी खर्चाची कण्हेर धरण पाणी उद्‌भव योजना शासनाने मंजूर केली. 2014 मध्ये या योजनेच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. हे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, योजनेतील काही कामे वाढल्याने त्यासाठीच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. यानुसार शासनाने 12 कोटींचा वाढीव निधी शाहूपुरी पाणी योजनेसाठी मंजूर केला. 

योजनेच्या कामासाठी वाढीव निधी मिळाल्याने प्रलंबित कामांना वेग आला आहे. कण्हेर धरणापासून योजनेसाठी टाकण्यात येणाऱ्या वाहिनीचे काम हिरापूर येथील वनक्षेत्रामुळे रखडले होते. वनक्षेत्रातून जलवाहिनी नेण्यास परवानगी मिळण्याचा प्रस्ताव त्या वेळी शाहूपुरी ग्रामपंचायतीने सातारा वनविभागाकडे सादर केला होता. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी कोल्हापूर कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावरील सुनावणी झाल्यानंतर अंतिम कार्यवाहीसाठी तो प्रस्ताव नागपूर वनविभाग कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव येत्या आठवडाभरात निकाली निघेल, अशी माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे वनक्षेत्रातून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामास गती येणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर भैरोबा डोंगर पायथ्याला असणाऱ्या फिल्टरेशन प्लॅंटपर्यंत पाणी येणे सुलभ होणार आहे. याठिकाणी पाणी आल्यानंतर योजनेची चाचणी घेण्यावर भर देण्यात येणार असून, ती यशस्वी झाल्यानंतर मेअखेर योजना कार्यान्वित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मागणीनुसार शुल्क आकारून जोडण्या मिळणार 

शाहूपुरी पाणी योजना नऊ हजार 750 ग्राहक नजरेसमोर ठेवत तयार करण्यात आली आहे. सध्या प्राधिकरणाच्या माध्यमातून चार हजार 500 ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्या ग्राहकांची माहिती पालिकेने प्राधिकरणाकडून घेतली असून, योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर मागणीनुसार नागरिकांना शुल्क आकारून नवीन जोडण्या देण्यात येणार आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT