Satara Latest Marathi News 
सातारा

म्हसवडच्या 'सीओं'चा अॅक्शन मोड; मास्क न लावणाऱ्यांवर कडक कारवाई

सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍यामध्ये विशेषतः दहिवडीसह इतर गावांतही कोरोना संसर्ग वाढून रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे शासन आदेशानुसार येथील पालिकेने (बुधवार) आठवडी बाजार बंद ठेवला. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरून मास्क न लावणाऱ्यांना शोधून काढून प्रत्येकी 500 रुपये दंडाची कारवाई केली. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बुधवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येत असल्याने शेतकरी, व्यापारी, दुकानदार, परगावच्या व्यापाऱ्यांना बाजारासाठी येऊ नये, असे आवाहन पालिकेने काल केले होते. त्यामुळे बाजार बंद राहिला. बाजारसह नियमित भरणारी भाजीमंडई देखील बंद ठेवली होती. बाजार बंद असला, तरी शहरातील सर्व दुकाने खुली होती. मात्र, पालिकेने शहर आणि परिसरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विनामास्क शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करत प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. 

विनामास्क फिरणाऱ्यांना आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसलेल्या दुकानदारांनाही दंड आकारण्यात आला. दिवसभरात सुमारे शंभरपेक्षा जास्त अधिक लोकांना दंड करण्यात आला. दरम्यान, नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. माने यांनी केले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT