Satara Latest Marathi News 
सातारा

कोरेगाव, रहिमतपूर, सातारारोडसह वाठार स्टेशन, पिंपोड्याचा बाजार बंद

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण जास्त संख्येने आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे तालुक्‍यातील कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन, सातारारोड व पिंपोडे बुद्रुक या पाच मोठ्या गावांतील आठवडा बाजार येत्या 12 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी काढला आहे. 

दरम्यान, दैनंदिन भाजी मंडई सुरूच राहणार आहे; परंतु या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखले जावे, यासाठी विक्रेत्यांना बसण्याच्या जागा आखून देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित गावांतील स्थानिक प्रशासनाला दिल्याची माहिती प्रांताधिकाऱ्यांनी दिली. 

यासंदर्भातील आदेशात प्रांताधिकारी यांनी म्हटले आहे, की जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कोरेगाव तालुक्‍यातील कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन, सातारारोड व पिंपोडे बुद्रुक येथील आठवडा बाजार येत्या 12 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. यासंदर्भात रहिमतपूर नगरपालिका व कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, तसेच कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन, सातारारोड व पिंपोडे बुद्रुक येथील मंडल अधिकारी व तलाठ्यांनी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT