Makar Sankranti Festival 
सातारा

फलटणात यंदा 'वाणवस्यावर संक्रांत'; राम मंदिरात महिलांना गर्दी करण्यास बंदी!

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : शहराचे ग्रामदैवत व ऐतिहासिक राम मंदिरात कोरोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने महिलांना संक्रांतीदिवशी वाणवसा घेण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे कोरोनामुळे हजारो महिलांच्या "वाणवस्यावर संक्रांत' आली आहे. ग्रामीण भागातील मंदिरातही महिलांना गर्दी करता येणार नाही. परिणामी, महिलांना यंदा घरीच वसा घ्यावा लागणार आहे. (Makar Sankranti Festival) 

राम मंदिरामध्ये शहरासह तालुक्‍यातील गावागावांमधून, तसेच शेजारील जिल्ह्यातील तालुक्‍यांतूनही संक्रांतीदिवशी महिला मोठ्या संख्येने येऊन वाणवसा घेतात. सकाळी सहापासून सायंकाळी उशिरापर्यंत राम मंदिर व आजूबाजूचा परिसर हजारो महिलांच्या गर्दीने गजबजतो. ग्रामीण भागातील महिला गाड्या करून येतात व येताना डबाही घेऊन येत असतात. राम मंदिराबरोबरच जबरेश्वर मंदिर, माळजाईदेवी, तळ्यातील देवी यांसह अन्य मंदिरांतही महिला जातात. परंतु, यंदाच्या संक्रांतीला मात्र दरवर्षी दिसणारे गर्दीचे चित्र दिसणार नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दी करण्यास प्रतिबंध केला आहे.

गुरुवारी (ता.14) संक्रांतीदिवशी सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत शहरातील श्रीराम मंदिर व परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संक्रांतीदिवशी वाणवसा घेण्यासाठी महिला राम मंदिरात उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता मंदिर व्यवस्थापनाने घ्यायची आहे. शहरातील अन्य मंदिरे व ग्रामीण भागातील मंदिर परिसरात जमावाने गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये, यासाठी आवश्‍यक सूचना व आदेशाचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहणार आहे, असे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT