Satara Latest Marathi News 
सातारा

खासगी शाळांच्या झगमगाटात 'झेडपी'चे अस्तित्व टिकून; रेठरेत विद्यालयाच्या भिंती बनल्या 'सेल्फी पॉइंट'

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : खासगी शाळांच्या झगमगाटात जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व कमी करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र, ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांनीही स्पर्धेच्या युगात आपले महत्त्व टिकवून ठेवले आहे. असेच लक्षवेधी उदाहरण ठरत आहे ते म्हणजे दुशेरे येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत. या शाळेच्या भिंती तर विद्यार्थ्यांना आकर्षित करतच आहेत. शिवाय युवा पिढीलाही या भिंतींसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या या भिंती सेल्फी पॉइंट ठरल्या आहेत. 

दुशेरे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शाळेतील विद्यार्थी संख्या वाढती राहावी, यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भिंतीवर ग्रामपंचायत व समग्र अनुदानातून आकर्षक चित्रे काढली असल्याने विद्यार्थी व युवकांसाठी ती सेल्फी पॉइंट बनू लागली असून, त्यामुळे विद्यार्थी शाळेत रमण्यास चांगली मदत होऊ लागली आहे. 

ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून एक, तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक अशा दोन खोल्या बांधण्यात आल्या असून, या खोल्यांना ग्रामपंचायतीच्या ग्राम निधीतून रंगकाम करण्यात आले आहे. रंगकाम झालेल्या भिंतीवर शाळेच्या समग्र अनुदानातून विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी लागावी, यासाठी विविध प्रकारची चित्रे काढण्यात आले आहेत. या बोलक्‍या भिंती गावातील तरुणांसाठी सेल्फी पॉइंट बनू लागल्या आहे. मध्य वस्तीत शाळेची भव्य इमारत आहे. यामध्ये पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरतात. शाळेचे मुख्याध्यापक उपशिक्षक व शिक्षकांचे गुणवत्तावाढीसाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT