Satara Latest Marathi News 
सातारा

रेठरेतील कृष्णा पुलाला 45 कोटींचा निधी मंजूर; पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठपुराव्याला यश

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : येथील कृष्णा नदीवर नवीन पूल उभारणीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुमारे 45 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेला हा पुलाचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. नव्या पुलाच्या निर्मितीनंतर गावच्या सौंदर्यात भर पडून दळणवळण सुलभ होणार आहे. श्री. चव्हाण यांनी परिसरातील कोडोली-पाचवड या महत्त्वाकांक्षी पुलासही निधी आणला आहे. त्या पुलाबरोबर रेठऱ्याचा पूल होणार असल्याने सर्वसामान्य जनतेत समाधानाचे वातावरण आहे. 

येथील गाव व परिसर तसेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना परिसरात येण्यासाठी कृष्णा नदीवरील पूल महत्त्वाचा मानला जातो. कारखान्याची बहुतांशी ऊस वाहतूक पुलावरून होते. त्याच पद्धतीने कऱ्हाड, वाळवा, शिराळा व कडेगाव तालुक्‍यांतील रहदारीही या भागातून होत असल्याने पुलास तितकेच महत्त्व आहे. कारखान्याच्या उभारणीनंतर रेठरे खुर्द येथील कृषितज्ज्ञ (कै.) सदुभाऊ पाटील यांनी लाकडी पूल उभारला होता. 

त्यानंतर माजी मंत्री (कै.) यशवंतराव मोहिते यांनी शासन निधीतून मोठा पूल उभारला. पुलामुळे शेतीसह रहदारीस फायदा झाला. 2006 मध्ये नदीस आलेल्या महापुरावेळी पुलाच्या एका खांबास तडा गेल्याने त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. तीच स्थिती 2019 मध्ये उद्‌भवली. त्यावर्षी महापुरात खांबास पुन्हा तडा गेल्याने पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे कृष्णा कारखान्याच्या ऊस वाहतुकीची मोठी गैरसोय झाली होती. प्रशासकीय पातळीवर गेली दोन वर्षे पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न रेंगाळलेला होता. या कामी आमदार चव्हाण यांचा गतीने पाठपुरावा सुरू होता. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT