उंब्रज (जि. सातारा) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे ते काशीळ या दरम्यान महामार्ग गेली अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. महामार्गालगत झालेले अतिक्रमण, संरक्षक कुंपण व प्राथमिक सुविधांच्या अभावामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे, तसेच महामार्गावर होणारी लूटमार, मारहाणीमुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याकडे रस्ते विकास महामंडळ व पोलिस लक्ष देणार का, असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग हा उंब्रजमधून जात असल्याने महामार्गालगतच्या अनेक गावांना त्याचा फटका बसत असतो. महामार्गावरील प्राथमिक सोयीसुविधांअभावी या मार्गावर नागरिकांची गैरसोय होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा सेवा रस्ता असणे आवश्यक आहे. मात्र, तो नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या होत आहे. परिसरातील भटकी जनावरे महामार्गावर येऊ नयेत, यासाठी संरक्षक जाळी लावणे आवश्यक आहे. मात्र, अशी जाळी नसल्याने भटकी जनावरे रस्त्याच्या मध्यभागी येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि वाहनधारकांचे अपघातात बळी जात आहेत.
तासवडे ते काशीळ य महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली असून, हॉटेल, गॅरेज यांचे महामार्गावर अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. भूमाफिया, तसेच हॉटेलचालकांनी महामार्गालगत भराव टाकून अतिक्रमण केलेले आहे; परंतु महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या समस्यांबाबतीत बोलायला तयार नाहीत, तर महामार्गाशेजारी सेवारस्त्याचा अभाव आणि पादचारी पुलांची कमतरता यामुळे स्थानिकांना जीव धोक्यात टाकून महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यातच एखादा अपघात झाला, तर रस्ते सुरक्षा विभागाची रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाही.
गेल्या काही वर्षांपासून तासवडे ते काशीळ या परिसरात महामार्गावर लूटमार व मारहाणीच्या घटना होत आहेत. रस्ते सुरक्षा विभाग व पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्या वाहनधाकांच्यात भीतीने वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संबंधित विभाग गांभीर्याने पाहणार का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
जखमींवर उपचाराबाबत दिरंगाई
महामार्गाची वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या आहे. अपघात कमी करण्यासाठी सेवारस्त्याची आवश्यकता आहे, तसेच ट्रकचालकांच्या आरामासाठी टर्मिनसची गरज आहे. महामार्गावरील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अपघातातील जखमींना वेळेवर योग्य उपचार
मिळत नाहीत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.