Satara Latest Marathi News 
सातारा

खुशखबर! आमदारांना वाढीव एक कोटीची लॉटरी; साताऱ्यातील दहा जणांना मिळणार बंपर 30 कोटी

उमेश बांबरे

सातारा : आमदारांना मिळणाऱ्या निधीतून मतदारसंघात लहानसहान कामेच करता येत होती; पण आता शासनाने आमदारांच्या निधीत आणखी एक कोटीनी वाढ करून यावर्षीपासून तीन कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीतून स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण करण्यावर खर्च करता येणार आहे. यापैकी मतदारसंघात झालेल्या विविध वास्तूंच्या व देखभाल दुरुस्तीवर यातील दहा टक्के हा निधी खर्च करता येणार आहे. जिल्ह्यात विधानसभेचे आठ, तर विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्याला आमदारांच्या माध्यमातून दहा कोटींचा वाढीव निधी मिळणार आहे. 

विधानसभा व विधान परिषदेच्या आमदाराला प्रतिवर्षी दोन कोटी निधी मिळतो. या निधीतून लहानसहान विकासकामे करता येतात. यामध्ये शाळा खोल्यांचे बांधकाम, अंगणवाडी खोल्यांचे बांधकाम, व्यायामशाळा, स्मशानभूमी, बसस्थांबा, शौचालये, लहान नाल्यांवरील फरशा, कोल्हापूर बंधारे आदी कामांचा समावेश होतो. स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमदारांना वर्षाला दोन कोटी रुपयांचा निधी मिळतो. त्यानुसार जिल्ह्यातील दहा आमदारांचा 20 कोटींचा निधी उपलब्ध होता; पण बांधकाम साहित्याची झालेली भाववाढ व इतर वाढलेला खर्च पाहता वाढीव निधी मिळावा आणि झालेल्या विविध कामांच्या देखभाल व दुरुस्तीसाठीही निधी मिळावा, अशी मागणी आमदारांची होती. त्यानुसार अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शासन निर्णयही जाहीर झाला आहे.

त्यामुळे प्रत्येक आमदाराला वाढीव एक कोटीचा निधी मिळणार आहे. या आर्थिक वर्षापासून या वाढीव निधीतून दहा टक्के म्हणजे 30 लाख रुपये यापूर्वी केलेल्या वास्तूंच्या देखभाल दुरुस्तीसाठी राखीव ठेवावा लागणार आहे. त्यापैकी दहा टक्के म्हणजे दहा लाखांचा निधी विशेष बाब म्हणून कोणत्याही परवानगीशिवाय खर्च करता येणार आहे. सातारा जिल्ह्यातील दहा आमदारांना वर्षाला दोन कोटींप्रमाणे 20 कोटी रुपयांचा निधी मिळतो आता या वाढीव एक कोटीमुळे हा निधी 30 कोटी रुपये झाला आहे. त्यामुळे आमदारांच्या माध्यमातून जिल्ह्याला दहा कोटींची लॉटरी लागली आहे. कोरोनाच्या काळात निधीची झालेल्या कपातीमुळे विकासकामांवर परिणाम झाला होता. मात्र, या वाढीव निधीमुळे सर्वच मतदारसंघांत आणखी चांगल्या प्रकारे विकासकामे मार्गी लागणार आहेत. 

देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष
 
अंगणवाडी, शाळांच्या खोल्या, तसेच व्यायामशाळेसह इतर कामे झाल्यानंतर काही दिवसांनंतर या शाळा खोल्यांची देखभाल व दुरुस्तीअभावी दुरवस्था होत होती. जिल्हा परिषद किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी निधी खर्च करण्याकडे दुर्लक्ष करत होत्या; पण आता आमदारांनाच वाढीव निधी उपलब्ध झाल्याने त्यातील दहा टक्के निधी या वास्तूंच्या देखभाल व दुरुस्तीवर खर्च करता येणार आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT