सातारा

शेखर सिंहजी, झेडपीच अशी वागली तर कसे आपण काेराेनाला राेखणार?

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत आज (शुक्रवार) दुपारी सर्वसाधारण सभा झाली. ही सभा व्हर्च्युअल पद्धतीने होणार असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. या सभेस एक वाजता प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले होते. सभेत एकेक विषयांचे वाचन झाले. काही विशिष्ट विषयांवर चर्चा झाली. सभागृहात पदाधिकाऱ्यांसह विविध विषयांच्या सभापती, निवड सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच सदस्य हे ऑनलाईनच्या माध्यमातून सभेत जोडले गेले होते. त्यातील काहींनी आपल्या घरातूनच सभेस मार्गदर्शन केले.

या सभेचे पत्रकारांना वार्तांकन करता यावे, यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना आखल्या जात आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळण्याबाबत सातत्याने शासनस्तरावर जागृती करण्यात येत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील दिवस रात्र कोरोनाबाबत जागृती सुरु आहे. विलगीकरण कक्षासह शाळांमध्ये देखरेख ठेवण्यात येत आहे.

अशातच आजच्या सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहातील सभेचे दृष्य पाहून आश्‍चर्य वाटले नाही तर नवलच. याचे कारणही तसे विशेषच म्हणावे लागेल. जिल्हा परिषदेची सभा झालेल्या सभागृहात सुमारे 20 ते 25 व्यक्तींची उपस्थिती होती. या सभेतील तब्बल 18 खुर्च्यांवर फुटभर देखील जागा न सोडता सर्वच जण शेजारी शेजारी बसलेले होते. यामुळे आम्ही शूर आहोत आम्हांला कोरोनाची कसली आली भीती अशा आविर्भावात सभा झाली. दरम्यान काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी जबाबदार असलेली जिल्हा परिषदच असे वागू लागली तर गावागावांत काय संदेश जाणार असा प्रश्न निर्माण हाेत आहे.

विराेधी पक्ष नेते अशोक मोनेंवर बरसल्या नगराध्यक्षा माधवी कदम

मुकवली माचीत अखेर उगवली पहाट!, तब्बल 13 दिवसांनी वीजपुरवठा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muktainagar News : मुक्ताईनगरात गुलाल उधळला! आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील नगराध्यक्षपदी विजयी

Vasai Virar Election : चिन्हांच्या खेळात अडकली महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडीची युती; वसई-विरारमध्ये राजकीय गोंधळ उभा!

अलिबागमधील 'या' गावात आहे रवी जाधव यांचं टुमदार फार्महाउस; फोटो पाहिलेत का? कासवाशी संबंधित आहे घराचं नाव

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण आणि सुटका

Viral Video : ''मॅडम माझ्या मुलीला मारू नका, तिला आई नाहीये'', भर वर्गात वडीलांना अश्रू अनावर; बाप-लेकीचा भावूक करणारा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT