Satara 
सातारा

उत्तर मांड धरण भरून वाहू लागले, अडीच हजार एकर शेती सिंचनाचा प्रश्‍न मार्गी

कृष्णत साळुंखे

चाफळ (जि. सातारा) : शेती सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी वरदाई ठरलेले गमेवाडी (चाफळ) येथील उत्तर मांड धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. चाफळ विभागापासून ते उंब्रजपर्यंतच्या जवळपास अडीच हजार एकर शेती सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान या प्रकल्पामुळे दरवर्षी भागत असते. सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरण पूर्ण भरून वाहू लागले असल्याने परिसरातील सर्व शेतकरी व इतर लोक समाधानी आहेत. 

आजवर उत्तर मांड धरण पाणलोट क्षेत्रात 850 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 0.88 टीएमसी, तर 687.50 मीटर पाणी संचय पातळी आहे. धरणाची लांबी एक हजार 420 मीटर तर उंची 44.45 मीटर आहे. धरणाचे बांधकाम 1997 मध्ये सुरू होऊन आज ते पूर्णत्वास गेले आहे. प्रकल्पात 625 एकर जमीन बाधित झाली असल्याने नाणेगाव व माथनेवाडी ही गावे पूर्ण पुनर्वसित झाली आहेत. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने आज सकाळी काही सुवासिनी महिलांनी खणा-नारळाने पाणीसाठ्याची ओटी भरून औक्षण केले आहे.

नदी पात्रामध्ये पाणी वाढल्याने काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. माथनेवाडी येथील उर्वरित 14 घरांचा खास बाब म्हणून पाठवलेला प्रस्ताव आजही प्रलंबित आहे. त्यामुळे धरणात 100 टक्के पाणीसाठा केला जाऊ शकत नाही. माथनेवाडीतील लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यास धरणाचे 18 फुटी वक्र दरवाजे बंद करून आणखी धरणामध्ये 18 फुटांनी पाणीपातळीत वाढ होऊ शकते, असे मत शेतकरी रामचंद्र काटे यांनी व्यक्त केले. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? मुंबई, पुणे मेट्रोसह ग्रामीण महाराष्ट्रासाठी तरतूद

Union Budget 2026 : अर्थसंकल्प २०२६ मध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठी भेट! सोलर उपकरणासह 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त

Budget Alcohol Rate: मद्यप्रेमींना मोठा धक्का! दारूचे दर महागणार; बजेटनंतर किमती किती वाढणार? जाणून घ्या...

Kolhapur ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवाराकडून कृषी साहित्य वाटप, भरारी पथकाची धडक कारवाई

U19 WC, IND vs PAK: ५ बॉलमध्ये मोठा ड्रामा! वैभव सूर्यवंशीला एकाच बॉलवर दोनदा जीवदान अन् मग भारताच्या पडल्या तीन विकेट्स

SCROLL FOR NEXT