Satara 
सातारा

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आता मोफत प्रसूती, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा)  : कोरोनामुळे सध्या सर्वत्र आर्थिक कोंडी झाली आहे. तीन महिन्यांत लोकांचा कामधंदा, व्यवसाय, उद्योग बंद राहिल्याने मोठे आर्थिक संकट आले आहे. या संकटकाळात धीर देण्यासाठी प्रशासनाने येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पिवळे, केशरी आणि पांढऱ्या रेशनिंग कार्ड असणाऱ्या महिलांची मोफत प्रसूती करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 जुलैपर्यंत मोफत प्रसूतीची कार्यवाही सुरू राहणार आहे. 

कोरोनामुळे सध्या महामारीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. गेली तीन महिने हाताला काम नसल्याने आणि उद्योग-व्यवसाय बंद राहिल्याने मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असली तरी त्याला अजूनही बराच काळ लागणार आहे. यादरम्यानच्या काळात अगोदरच पैशांची चणचण झाल्याने दवाखान्यांचा खर्च न परडवणाराच ठरत आहे. खासगी रुग्णालयात प्रसूती करण्यासाठी किमान 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च येतो. त्याचबरोबर इतरही विविध कारणांसाठी खर्च करावा लागतो. या महामारीच्या काळात लोकांना एवढा खर्च करणे शक्‍य नाही. त्यासाठी अनेकांवर उसनेपासने करण्याची वेळ आली आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने येथील सह्याद्री हॉस्पिटलला मोफत प्रसूती करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पिवळे, केशरी आणि पांढऱ्या रेशनिंग कार्ड असणाऱ्या महिलांची मोफत प्रसूती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत मोफत प्रसूतीची कार्यवाही सुरू राहणार आहे. त्याला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेची जोड देवून कोरोनाच्या संकट काळात मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्याचा मोठा हातभार सर्वसामान्य कुटुंबातील प्रसूत होणाऱ्या महिलांना लागणार आहे. 

""सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पिवळे, केशरी आणि पांढऱ्या रेशनिंग कार्ड असणाऱ्या महिलांची मोफत प्रसूती करण्यात येणार आहे. हॉस्पिटलमध्ये 31 जुलैपर्यंत मोफत प्रसूतीची कार्यवाही सुरू राहणार आहे. त्यानंतर पुढील आदेश आल्यावर प्रसूतीसंदर्भातील पुढील निर्णय घेतला जाईल.'' 

-विश्वजित डुबल, 
सहायक व्यवस्थापक, 
सह्याद्री हॉस्पिटल, कऱ्हाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger : शिवसेनेत पुन्हा भूकंप; ठाकरेंचे ६ खासदार १९ जूनला शिंदे गटात प्रवेश करणार? दिल्लीत मध्यरात्री राजकीय हालचालींना वेग

‘एसपीं’चा ‘वसूलदार’ना दणका! सोलापूर ग्रामीणमधील ७२४ पोलिसांच्या बदल्या; पण तक्रारी असलेले, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांची दूरवर बदल्या

आजचे राशिभविष्य - 17 जून 2026

17 जून 2026 पंचांग! महाराणा प्रताप जयंती, रवियोग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

Argentina vs Algeria : लिओनेल मेस्सीने इतिहास रचला! Fifa World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच; किलियन एमबापेला काही तासांत धक्का

SCROLL FOR NEXT