karad 
सातारा

बापरे! राज्यातील 21 हजार कर्मचाऱ्यांची उपासमार

साहेबराव हाेळ

गोडोली (जि. सातारा) ः सातारा शहर व जिल्ह्यात वाचन चळवळ जोमाने विस्तारली जात असताना मार्चपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील व जिल्ह्यातील सगळी सार्वजनिक व खासगी वाचनालये कुलूपबंद आहेत. मागील वर्षाचा अनुदानाचा एकच हप्ता मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे पगारही थांबले आहेत. वाचकांना आवडीची पुस्तके मिळेनात. राज्यातील 12,148 व जिल्ह्यातील 395 वाचनालयांतील एकूण 21,613 कर्मचारी पगार नसल्याने अडचणीत आहेत. 

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी जाहीर झाली. पुढील काळात कमी-अधिक प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. अशा स्थितीत अगोदरच अत्यल्प पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराविना जगणे अडचणीचे झाले आहे. मुळातच या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ ग्रंथालयाचे काम करावे लागते. मात्र, पगार अत्यंत कमी असतो. मिळणाऱ्या अनुदानात 50 टक्के खर्च हा पुस्तके आणि वृत्तपत्रे, मासिकावर करावा लागतो. पुस्तक खरेदी, मासिके व वृत्तपत्रांची वर्गणी अगोदर भरावी लागते. पुस्तक खरेदी करावी लागते. या सगळ्या बाबी संचालकांना पदरमोड करून करावी लागत आहेत. शिवाय वर्षाची वाचकाकडून मिळणारी वर्गणी प्रतिमहा दहा रुपये ते 50 रुपयांपर्यंतची आवक थांबली. "अ' व "ब' वर्गातील वाचनालयात देणगीदाराकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही वाचकप्रेमी पुस्तक व वस्तुरूपाने देणग्या देतात. या सगळ्या बाबी थंडावल्या आहेत. 

सातारा जिल्ह्यात "अ', "ब', "क', "ड' या वर्गातील 395 सार्वजनिक वाचनालये आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रंथालय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील वाचनालयांचा कारभार चालतो. या वर्षी टाळेबंदीमुळे वाचकांची पावले वाचनालयापासून बाजूला गेली आहेत. सध्याच्या परिस्थितीत शासनाने व संबंधित यंत्रणेकडून किमान राज्यातील 21,613 कर्मचाऱ्यांना जे तुटपुंजे मानधन मिळते तेवढे तरी त्यांना देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी कर्मचारी व संचालकाकडून मागणी होत आहे. 


शासनाने अनुदानाचा पहिला हप्ता द्यावा 
थकीत अनुदानासह 2020-21 मधील अनुदानाचा पहिला हप्ता शासनाने सर्वच वाचनालयांना द्यावा, तरच वाचनालयातील कर्मचारी टिकून राहतील. त्यांच्या किमान गरजा भागवण्यासाठी शासनाने त्यांना पगार देणे गरजेचे आहे. पुढील कालावधीतही वाचनालयाकडे शासनाने दुर्लक्ष न करता वेळेत अनुदान द्यावे, अशी मागणी कोरेगाव तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष एम. बी. भोसले यांनी केली आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra liquor policy : राज्य सरकारची नवी 'महाराष्ट्र मद्य श्रेणी' अडचणीत?; बड्या कंपन्यांनी कोर्टात दिलं आव्हान!

SMAT 2025: गंभीरच्या राजकारणाचा बळी पडलेल्या गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक; ट्वेंटी-२० संघातून दाखवला होता बाहेरचा रस्ता, पठ्ठ्याने...

Winter Car Care Tips: हिवाळ्यात कारच्या मेंटेनन्स चिंता मिटवा! 'या' 5 टिप्समुळे बॅटरी, टायर, इंजिन राहील परफेक्ट

Business Ideas for Women: ऑफिसचा ताण संपला! महिलांसाठी घरबसल्या सुरु करता येतील असे कमी गुंतवणुकीचे फायदेशीर व्यवसाय

रजनीकांतसाठी श्रीदेवीचा ७ दिवसांचा उपवास! बोनी कपूरांनाही थक्क करणारी गोष्ट

SCROLL FOR NEXT