Satara 
सातारा

राज्यात पटसंख्येत अव्वल "या' शाळा प्रवेशोत्सवास शिक्षणमंत्र्यांची ऑनलाइन उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा)  : राज्यात सर्वाधिक पटसंख्या असलेल्या येथील पालिका शाळा क्रमांक तीनमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी ऑनलाइन शाळा प्रवेशोत्सवास ऑनलाइन उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. यावेळी राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत शासनाचे नियोजन झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाचे संकट असल्याने सोमवारपासून (ता. 15) शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही शाळा सुरू झाल्या नाहीत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबात शासनाने निर्णय घेतल्याचे काल जाहीर केले. त्याचवेळी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी झूम ऍपद्वारे येथील पालिका शाळा क्रमांक तीनच्या ऑनलाइन शाळेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील, "एनसीईआरटी'चे विकार गरड, "बालभारती'च्या अध्यक्षा शकुंतला काळे, जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, पालिकेच्या प्रशासन अधिकारी जमिना मुलाणी, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदींची उपस्थिती होती.

झूमद्वारे मंत्री गायकवाड यांनी पालिका शाळा क्रमांक तीनच्या विद्यार्थ्यांसह शिक्षण, पालकांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ""कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्राचे नुकसान होत आहे. ऑनलाइन शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुख्यमंत्र्यांनी राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रात आयुक्तांची परवानगी आवश्‍यक आहे. त्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका होऊन ठराव होणे गरजेचे आहे. शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी प्रास्ताविकात शाळेची माहिती दिली. 

""कऱ्हाड पालिका शाळा क्रमांक तीनमध्ये प्रवेशासाठी लोकांची रांग लागते, यावरून शाळेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे दिसून येते. अन्य शासकीय शाळांनी या शाळेचा आदर्श घ्यावा. शाळा सुरू करताना शाळांनीही आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियम, निकषांचे पालन करावे.'' 

-वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT