karad 
सातारा

ग्रामसमित्या सक्षम केल्या तरच...

सकाळ वृत्तसेवा

उंब्रज (जि. सातारा) ः उंब्रजसह परिसरातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. उंब्रजसह परिसरातील दहापेक्षा जास्त गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यासाठी प्रशासनाबरोबर ग्राम समिती अधिक सक्षम होण्याची गरज आहे. 

उंब्रज हे मुख्य बाजारपेठेचे गाव असून, परिसरातील अनेक नागरिकांची अत्यावश्‍यक वस्तूसाठी नेहमीच वर्दळ सुरू असते. त्यातच मुंबई, पुणे, तसेच परजिल्ह्यातून अनेक लोक येत असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. उंब्रजसह परिसरातील दहापेक्षा जास्त गावांमध्ये ट्रॅव्हल हिस्ट्रीतील कोरोना रुग्ण सापडले आहेत. काही गावे कोरोना हॉटस्पॉट घोषित करण्यात आली होती. त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले असले, तरी ग्राम समित्यानी अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. 

सध्या कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी देश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत शक्‍य तेवढ्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. येथे घरोघरी जाऊन कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्यासंदर्भात सूचना देण्यात येत असून, बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना घरीच राहण्यासाठी सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, सतत हात साबणाने धुवावेत, सर्दी, खोकला, ताप असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन ग्रामसमिती करत आहे; परंतु अनेक जण या नियमांचे उल्लंघन करत आहेत. 

गावातील ग्राम समित्यांनी विशेष अधिकार वापरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांच्यातून बोलले जात आहे. ग्रामसमित्या कागदावरच न राहता या समितीतील सदस्यांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी गावपातळीवर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBBSच्या विद्यार्थ्यांना दिलासा! अतिरिक्त परीक्षेची संधी; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय

SANJU SAMSON RECORD: जगात भारी संजू सॅमसनचा विक्रम! जोस बटलरला मागे टाकत २००+ स्ट्राइक रेटने नवा विक्रम;T20 क्रिकेटमध्ये बनला नंबर वन!

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

करण जोहरला हवा आहे आयुष्याचा जोडीदार! म्हणाला, ‘लग्न कदाचित शक्य नाही, पण…’

Thane Water Supply: ठाणे जिल्ह्यात जलसंकटाचे सावट! तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागात कधी पाणीबाणी?

SCROLL FOR NEXT