karad 
सातारा

या भागात महामार्गाचा काही भाग गेला पाण्याखाली

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) ः पावसाळा आला, की कऱ्हाड- विटा राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा कॅनॉल ते कृषी चिकित्सालयादरम्यानचा रस्ता पाण्याखाली जातो. महामार्ग चौपदरीकरण झाल्यापासून पाणी साचून राहण्याची डोकेदुखी कायम आहे. सहा वर्षांनंतर आजअखेरही ती कायमच आहे. पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने आणि निचऱ्याचे नैसर्गिक स्त्रोत बुजवण्यात आल्याने ही स्थिती झाली आहे. त्यामुळे त्या मार्गावरील वाहनधारक, तेथील व्यापारी, उद्योजकांसह अनेक कुटुंबीयांची परवड झाली आहे. 

कऱ्हाड- विटा राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा कॅनॉल ते सैदापूर कृषी चिकित्सालयादरम्यानचा रस्ता नावारूपास आला आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून या रस्त्याला पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहण्याचे ग्रहण लागले आहे. मागील वर्षी महापुरादरम्यान मोठ्या प्रमाणात अनेक दिवस पाणी साचून राहिले होते. त्या वेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी तेथील साचणाऱ्या पाण्यावर तोडगा काढण्याची कार्यवाही करण्याचे ठरवले होते. मात्र, त्यानंतर दुसरा पावसाळा आला, तरीही संबंधित रस्त्यावरील पाण्याची जैसे थे अशीच स्थिती आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचबरोबर त्या परिसरात असणारे व्यापारी, उद्योजकांसह व त्या परिसरात राहणाऱ्या अनेक कुटुंबीयांची पावसाळ्यात मोठी परवड सुरू आहे. केवळ पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने आणि निचऱ्याचे नैसर्गिक स्त्रोत बुजवण्यात आल्याने ही स्थिती निर्माण होत आहे. त्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आली, तरच तेथील साचणाऱ्या पाण्याची समस्या कमी होईल. 

ठोस उपाययोजनाच नाही 
पावसाळ्यात दर वर्षी कृष्णा कॅनॉल ते सैदापूर कृषी चिकित्सालया दरम्यानचा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पाणी साचले, की प्रशासकीय यंत्रणा तेवढ्यापुरती जागी होते. पाण्याचा निचरा झाला, की पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न अशीच स्थिती निर्माण होते. त्यानंतर मात्र आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. ठोस उपाययोजनाच केल्या जात नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. 

अनेक वाहनांचे नुकसान 
कऱ्हाड-विटा राष्ट्रीय महामार्ग हा वर्दळीचा महामार्ग आहे. त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. कोरोनामुळे ती संख्या सध्या शेकड्यात आली आहे. मात्र त्या मार्गावर पाणी साचल्याने त्या मार्गावरून वाहनांची पाण्यातूनच ये-जा सुरू आहे. परिणामी अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांचेही मोठे नुकसान होत आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT