Satara 
सातारा

पाटणवासीय घालताहेत कोरोनाला पायघड्या! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : गणेशोत्सवाची धामधूम, उत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन, बाजारपेठात गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क व सॅनिटायझर वापराबाबत नसणारे गांभीर्य पाहाता आगामी काळात कोरोनाचा विळखा तालुक्‍यात घट्ट होणार असे वाटू लागले आहे. एकूण वातावरण पाहता कोरोनाला तालुकावासीय पायघड्या घालत आहेत, असेच चित्र तालुकाभर पाहावयास मिळत आहे. 

लॉकडाउनपासून साडेतीन महिने म्हणजेच एक जुलैपर्यंत केवळ 101 कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या तालुक्‍यात एक ऑगस्टपर्यंत 282, तर या महिन्यात रुग्णांचा आकडा 515 वर गेला आहे. सुरुवातीला काही गावांपुरता मर्यादित असणाऱ्या कोरोनाने संपूर्ण तालुकाभर हातपाय पसरले आहेत. सामूहिक संसर्गामुळे एका दिवसाला पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची संख्या 15, 20 आणि 25 पर्यंत गेली आहे. एक जुलैपासून कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला. त्या वेळी 101 रुग्णसंख्या होती. मात्र, जुलै महिन्यात झपाट्याने वाढ झाल्याने 181 बाधित सापडले. ऑगस्ट महिन्यातील 20 दिवसांत एकूण बाधितांची संख्या 233 झाली आहे. 

गणेशोत्सवास आजपासून (ता. 22) सुरुवात होत आहे. खरेदीसाठी बाजारपेठात गर्दी वाढू लागली आहे. शहरातून चाकरमानी गणेशोत्सवासाठी तालुक्‍यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाच्या हाताबाहेर गेले आहे. गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडी बाजारपेठात होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूरता फज्जा उडाला आहे. मास्क न वापरता फिरणाऱ्या तरुणांना व बेजबाबदार लोकांवर पोलिसांचे नियंत्रण राहिले नाही. लोकप्रतिनिधी पाहणी दौरे व आढावा बैठकांत व्यस्त असल्याचे चित्र कोरोनाला पायबंद घालू शकलेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सलग पाच महिने लढा देऊन थकलेली पाहावयास मिळते. 

कोरोनाची भीती जनतेने झुगारल्याचे एकूण वातावरण आहे. कोरोनामुळे झालेल्या 26 लोकांच्या मृत्यूचे कोणाला काहीही सोयरसुतक नाही. त्यामुळे चाकरमान्यंचे आगमन, उत्सवाची खरेदी, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर न करणे या सर्व बाबी कोरोनाला पायघड्या घालत आहेत. त्यामुळे काही दिवसांत कोरोनाचा विळखा घट्ट झालेला पाहावा लागेल. 

विलगीकरण कक्षात "अमृता'चे प्राशन करून धिंगाणाही! 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट सहवासातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल केले जाते. विलगीकरण कक्षात आपण प्रशासकीय यंत्रणेचे जावई असल्यासारखा काही जणांचा थाट असतो. सोयीसुविधा नाहीत म्हणून कांगावा करणे, कक्षात मनमानी करणे, यंत्रणेला आत्महत्येची धमकी देणे असे प्रकार दररोज घडत आहेत. काही युवक तर विलगीकरण कक्षातील महिला कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करीत असून, अश्‍लील टोमणे मारत आहेत. काही जणांनंतर मित्रांनी पुरविलेल्या "अमृता'चे प्राशन करून धिंगाणाही घातल्याचा प्रकार घडला आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT