Satara Crime News sakal
सातारा

Satara Crime News: सोने लुटणाऱ्या दोघा बिहारींना अटक

फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी; सोने पॉलिशच्‍या बहाण्‍याने करत होते लूटमार

सकाळ वृत्तसेवा

फलटण शहर : सोने पॉलिश करून देण्याचा बहाणा करून ग्रामीण भागातील महिलांची फसवणूक करणाऱ्या दोघा सराईतांना ग्रामीण पोलिसांनी गुणवरे (ता. फलटण) येथून अटक केली. संबंधितांकडून पोलिसांनी एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

सुबोध प्रताप शहा व अबोध प्रताप शहा (रा. पंछगंछिया, जि. भागलपूर, बिहार) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की दुधेबावी (ता. फलटण) येथील एका महिलेला दागिन्‍यांना पॉलिश करून देतो, असे सांगत हातचलाखीने तिचे पंचेचाळीस हजार रुपयांचे मंगळसूत्र व गंठण व दागिने लांबविल्याचा गुन्हा सहा मार्च २०२३ रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. संशयिताला गुणवरेतील मार्केट यार्डमधून ताब्‍यात घेतले.

संबंधित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर परांडा, कळंब पोलिस ठाणे येथेही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तसेच त्यांनी महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यातही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दुधेबावी येथील महिलेचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण सव्वा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधिकारी बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार व पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, पोलिस हवालदार साबळे, पोलिस नाईक अभिजित काशीद, अमोल जगदाळे, धराडे, पोलिस कॉन्‍स्‍टेबल महेश जगदाळे, सचिन पाटोळे, निखिल गायकवाड, तुषार नलवडे व पोलिस नाईक राणी गळवे यांनी केली.

दरम्यान, फलटण ग्रामीण भागात जर अन्य कुणाची या पद्धतीने फसवणूक झाली असेल, तर त्यांनी तातडीने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार आमश्या पाडवी शेतकऱ्यांचा बांधावर

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

Nashik News : ८ महिन्यांपासून आमदारांचा निधी अडकला! ‘ई-समर्थ पोर्टल’च्या चाचणीमुळे विकासकामांवर 'ब्रेक', लोकप्रतिनिधींपुढे नवा पेच

SCROLL FOR NEXT