Satara 
सातारा

मायणी-म्हसवड रस्त्यावरील खड्डा अखेर मुजवला

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : मायणी-म्हसवड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली होती. या रस्त्यावर वडजलपासून काही अंतरावर पेट्रोल पंपानजीकच्या उतारावर मोठा खड्डा पडलेला असल्याने अपघातांसह अनेक समस्या निर्माण होत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे डॉ. प्रमोद गावडे यांनी खड्ड्याचे हळदी-कुंकू आणि पुष्पगुच्छ वाहून पूजन केल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रकाशित होताच बांधकाम विभागाने तातडीने खड्डा मुजवून घेतल्याने रस्ता वाहतुकीस निर्धोक झाला आहे. 

मायणी-म्हसवड हा रस्ता सतत रहदारीचा असल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत होती. आता सध्या हा खड्डा मुजवल्याने वाहने सुसाट धावत आहेत. वाहने खड्ड्यात आदळून अपघात घडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे स्थानिक रहिवाशी सांगत आहेत. मात्र, काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खचून मध्येच फुगवटा आलेला आहे. रस्त्याची पातळी बिघडल्याने वाहनांना झोला बसून अपघात होण्याचा धोका अजून आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

रस्त्यावरील खड्डे मुजवण्यासाठी संबंधित विभागास भाग पाडल्याबद्धल आम्ही "सकाळ' व डॉ. गावडे यांच्या "टीम'चे आभारी आहोत, असे मत प्रवासी आणि वाहनचालक व्यक्त करत आहेत. संबंधित विभागाने खड्डे न मुजवल्यास भविष्यात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा डॉ. गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला इशाराही कामी आल्याचे वाटसरू म्हणून आभार मानत आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT