Satara 
सातारा

अजिंक्‍यतारा रस्त्याची दुर्दशा, बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

साहेबराव होळ

गोडोली (सातारा) : अजिंक्‍यताऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची साईबाबा मंदिर ते पायथ्यापर्यंत अत्यंत दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने रस्त्यात खोदाई झाल्याने खड्डे पडले आहेत. तर अजिंक्‍य चौकातील सततच्या पाणी गळतीमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिकेच्या बांधकाम विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याला कोणी वालीच नाही, अशी परिस्थिती आहे. 

साईबाबा मंदिराच्या पश्‍चिमेला असणाऱ्या कमानीपासून अजिंक्‍यताऱ्याच्या पायथ्यापर्यंत अनेक वेळा या रस्त्याची डागडुजी झाली. त्यात कमानीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत दीड वर्षापूर्वी पाणी गळतीच्या निमित्ताने डांबरीकरण झाले. टाकीपासून पायथ्यापर्यंतच्या रस्त्यापैकी पायथ्यापासून नलावडे कॉलनीपर्यंत अलीकडे डांबरीकरण झाले. रस्त्याच्या उत्तरेकडील गटारात सिमेंट पाइप टाकल्या. मात्र, नलावडे कॉलनी ते पाण्याच्या टाकीपर्यंत गेले काही वर्षे रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणत्या ना कोणत्या कारणाने खोदाई झाली. त्यामध्ये "बीएसएनएल' कार्यालयापासून माधुरी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्तीच्या निमित्ताने जीवन प्राधिकरणाने चौकातच जुन्या वाहिन्या काढून नवीन रबरी पाइप जोडून पाणीपुरवठा केला; पण घडलेले खड्डे, तसेच ठेवले. परिणामी रस्त्यातच खड्डे तयार झाले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजिंक्‍यताऱ्याच्या पूर्वेकडील बाजूने येणारे पावसाचे पाणी अरुंद गटारामुळे रस्त्यावरूनच वाहत असते. या संदर्भाने "सकाळ'ने अनेकदा आवाज उठविला; पण पालथ्या घड्यावर पाणी अशी स्थिती आहे. वास्तविक पाहता पावसाचे व दैनंदिन वापराचे पाणी 
याची क्षमता विचारात न घेता तात्पुरती गटारे बांधली आहेत. सध्या येथील रहिवाशी व प्रवासी लहान मोठ्या अपघाताला सामोरे जात जीव मुठीत घेऊन ये- जा करत आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT