13 Bike Thieves esakal
सातारा

साताऱ्यात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एलसीबीची धडक कारवाई

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : शेरे येथील महाबॅंकेचे एटीएम (ATM) फोडून चोरीचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यासह 13 दुचाकी चोरणाऱ्या तिघांच्या टोळीचा सातारा एलसीबीने पर्दाफाश केला. त्यांच्याकडून तेरा दुचाकी जप्त केल्या आहेत. एटीएम फोडण्यासाठी वापरलेली हत्यारेही पोलिसांनी (Police) जप्त केली आहेत. कऱ्हाड तालुक्‍यातील दोघांचा त्या टोळीत समावेश आहे. किशोर कृष्णा गुजर (24, रा. कोडोली, ता. कऱ्हाड) व रोहित आनंदा देसाई (23, रा. तांबवे, ता. कऱ्हाड), तर महादेव बाळासाहेब कोळी (वय 30, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा) अशी संबंधितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Satara Police Arrested A Gang Of 13 Bike Thieves Satara Crime News)

शेरे येथील महाबॅंकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करण्याच्या टोळीचा सातारा एलसीबीने पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ (Police Inspector Kishor Dhumal) यांच्या नेतृत्वाखाली चोऱ्यांच्या तपासाला पथकाची नेमणूक केली होती. त्या पथकाला गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा येडेमच्छिंद्रगडातील कोळी यांस अटक केली. त्यानुसार टोळीतील नावे व चोऱ्यांचे गुन्हे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यांतर्गत सात, कऱ्हाड शहरच्या तीन, तळबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक, तर सांगली जिल्ह्यातील कुरळपच्या हद्दीतील दोन, पलूस येथील एक दुचाकी चोरल्याची माहिती देत त्या दुचाकीही त्यांनी दिल्या.

दुचाकीसह शेरे येथील महाबॅंकेचे एटीएम फोडण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यानुसार त्यात वापरलेली हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह आनंदसिंग साबेळ, सहायक फौजदार ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार कांतीलाल नवघणे, संतोष, पवार, शरद बेंबले, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, गणेश ससाणे, अमित सपकाळ, रवी वाघमारे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी सहभाग घेतला.

Satara Police Arrested A Gang Of 13 Bike Thieves Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT