सातारा

पोलिसांची फसवणूक करणारा पुण्यात सापडला

सकाळ वृत्तसेवा

सातारा : इच्छित ठिकाणी बदली करण्याचे आमिष दाखवून जिल्हा पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे.
 
पोलिस कर्मचाऱ्यांना तुमची बदली करून देतो, अशी बतावणी करून एका व्यक्तीने पश्‍चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना फोन करून व पैशाची मागणी करून फसवणूक केली असल्याची, तसेच त्याने नुकतेच सातारा जिल्ह्यातील पोलिसांनाही फोन करून फसवण्याचा प्रयत्न केला असल्याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती.
 
पोलिसांचीच फसवणूक करण्याचा प्रकार गंभीर असल्यामुळे त्यांनी तत्काळ सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून स्वत: या गोष्टीची शहानिशा करून घेतली. त्यानंतर वाई व पाचगणी पोलिस ठाण्यातील एकूण तीन कर्मचाऱ्यांना संबंधित व्यक्तीने फोन केला असल्याची माहिती काल रात्री समोर आली.
 
या तिन्ही कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखून पैसे पाठवण्यास नकार दिला होता; परंतु असा गुन्हेगार मोकाट राहता कामा नये, यासाठी त्याने केलेल्या फसवणुकीच्या प्रयत्नासाठी, तसेच स्वतःचे नाव व पद याबाबत दिलेल्या खोट्या ओळखीसाठी त्याच्यावर तत्काळ दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तत्काळ या गुन्ह्याचा तपासाला सुरुवात केली. बारा तासांच्या आत त्याला पुणे शहरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे व कर्मचाऱ्यांनी यांनी रात्रभर घेऊन त्याला अटक केली. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
 
दरम्यान, फोनवर खोटी माहिती देऊन फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आपल्या अवतीभवती घडत असतात. यापासून बचाव करण्यासाठी सर्वांनीच सतर्क राहणे अत्यंत आवश्‍यक आहे. मोबाईल फोन, ई-मेल, सोशल मीडिया यांचा वापर करून प्रलोभने दाखवणाऱ्या व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन अधीक्षक सातपुते यांनी केले आहे, तसेच या प्रकारातील संशयास्पद कॉल आला, तर तत्काळ पोलिसांशी संपर्क करा, तसेच हीच बाब पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडल्यास त्यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठांना याची कल्पना द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

पाेलिसांच्या खिसे भरु प्रवृत्तीमुळे सातारकरांचा जीव टांगणीला; हॉटेल व्‍यवसायाला अच्‍छे दिन...

एमपीएसएसीत चमकून या विद्यार्थ्यांनी वाढविला दुष्काळी भागाचा नावलौकिक

सातारा : सहा हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल 

राष्ट्रवादीची राष्ट्रवादीकडूनच धुळधाण... भाजपला अच्छे दिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT