कराड गुंडागर्दी 
सातारा

डॉन म्हणून आला अन्‌ चोप खाऊन गजाआड झाला

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील कथीत डॉन एका युवकाला धमकावण्यासाठी त्याने बोलवलेल्या ठिकाणी पोचणार होता. मात्र तो डॉन पोचण्याआधीच तेथे पोलिस पोचले. त्यांनी तेथे रचलेल्या सापळ्यात कथित डॉन त्याच्या साथीदारांसह अलगद अडकला.

संबंधित डॉन त्याच्या साथीदारांसह दहशत माजवण्यासाठी तेथे पोचला अन्‌ तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी डॉनसह त्याच्या साथीदारांना चोपही दिला. काल रात्री उशिराच्या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे. युवकावर दहशत माजविण्यासह त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी डॉनगिरी करणाऱ्या संबंधित युवकांची चांगलीच हौस भागल्याची चर्चा शहरात आहे. 

शहरातील गुंडगिरी व त्यांची दहशत सगळ्यांना माहिती आहे. त्यातून येथील गुंडाच्या टोळ्यांकडे विनापरवाना पिस्तूलसारखी हत्यारेही आली. अनेकांच्या मनात डॉनगिरीविषयी तिरस्काराची भावना आहे. टोळ्यांमधील संघर्ष अनेकदा विकोपाला जाताना दिसतो. त्याच वर्चस्ववादातून गोळीबार करत येथे काही खुनाच्या घटना घडल्या. एक टोळी दुसऱ्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी दहशत माजवते. त्यासाठी संबंधित डॉन सामान्यांवर पहिली दहशत बसावी, यासाठी प्रयत्न करतात.

अशाच एका कथित डॉनच्या टोळीने काल हा प्रकार केला. त्यांनी दहशत माजविण्यासाठी प्लॅनिंग तर केले होते; परंतु त्यांचे सारे प्लॅनिंग पोलिसांना कळाल्याने त्या डॉनच्या अगोदर पोलिसच त्या ठिकाणावर पोचले अन्‌ डॉनसह त्याची टोळी गजाआड केली. 

पोलिसांनी घटनास्थळावर कथित डॉनला बेदम चोप दिला. पुन्हा दुसऱ्यांदा तो अशी दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार नाही, याचा बंदोबस्त पोलिसांनी केला आहे. पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांना त्याची माहिती मिळली होती. त्यांनी निवडक पथकाला घेऊन डॉनची डॉनगिरी उघड केली. एका युवकाला त्याच्या व्यक्तिगत कारणावरून तो कथित डॉन सतावत होता. त्याला दहशतीखाली कायम ठेऊन त्याच्याकडे पैशाचीही मागणी करत होता. संबंधित युवकालाही काय करावे कळत नव्हते. त्याने त्याची माहिती एकाला सांगितली. त्यांनी ती माहिती पोलिस उपअधीक्षक गुरव यांच्यापर्यंत पोचवली. त्यानंतर सर्व चक्रे फिरली.

काल संबंधित कथित डॉनने त्या युवकाला फोन करून भेटायला बोलावले. युवकाने ती माहिती त्वरित पोलिसांना दिली. तो कथित डॉन व त्याची टोळी त्या युवकापर्यंत पोचण्यापूर्वीच तेथे पोलिस पोचले. दहशत माजविण्यास आलेल्या त्या कथित डॉनसह त्याच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे डॉनगिरी करण्याची कथित डॉनसह त्याच्या टोळीची हौस चांगलीच भागली आहे, अशी शहरात चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...

Nalkehda Car Accident : रात्रीच्या अंधारात भाविकांवर काळाचा घाला! पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने ३ मुलांसह ८ जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT