सातारा

जगापासून लपण्यासाठी गेली लॉजच्या आश्रयाला... आता न्यायालयात माराव्या लागणार जोडीने चकरा

सकाळ वृत्तसेवा

सातारा, ता. 3 : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल, लॉज बंद असल्यामुळे प्रेमीयुगुलांची चांगलीच ताटातूट झाली आहे. मात्र, लॉकडाउनमध्येही भेटीची उबळ न आवरलेली सातारा तालुक्‍यातील चार जोडपी पोलिसांच्या छाप्यामुळे चांगलीच अडचणीत आली. जगापासून लपण्यासाठी लॉजच्या आश्रयाला गेली खरी परंतु, भांडाफोड झाल्याने स्व:ची पंचाईत करून बसली. आता जोडीने त्यांना न्यायालयात चकरा माराव्या लागणार आहेत. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू गेलेल्या लॉकडाउनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच दुकानांवर बंदी घातली होती. चौथ्या लॉकडाउनमध्ये दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील दुकाने सुरू झाली. परंतु, संसर्गाचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे हॉटेल व लॉजवर असलेली बंदी अजूनही कायम आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ हा लॉकडाउन सुरू आहे.

त्यामुळे चोरीछुपके प्रेम करणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. सर्वजण घरात आहेत आणि बाहेरचे लॉज व सार्वजनिक ठिकाणे बंद आहेत. त्यामुळे एकमेकांना भेटायचे कसे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे. परंतु, त्यातून अनेकांना प्रेमाची उबळ दाबणे शक्‍य नाही. ते लपून-छपून कोणत्या लॉजमध्ये आश्रय मिळतो का, याच्या शोधात आहेत. नियम डावलणाऱ्या काही लॉज चालकांकडून या जोडप्यांच्या प्रेमाला आधार दिला जात आहे. 

सातारा-मेढा रस्त्यावर कण्हेर (ता. सातारा) गावच्या हद्दीतील साईसागर हॉटेल व लॉज आहे. तेथेही प्रेमीयुगुलांना आसरा मिळत असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी कण्हेर गावच्या हद्दीत निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांसह हल्लाबोल केला. त्या वेळी लॉजच्या बाहेर गाड्या उभ्या होत्या.

पोलिसांनी अचानक मारलेल्या छाप्यामुळे हॉटेलमधील प्रेमीयुगुलांची चांगलीच तारांबळ उडाली. एकेकांकडे पोलिसांनी घराबाहेर पडण्याचे कारण विचारले. परंतु, सांगायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. शारीरिक अंतराचे पालन का केले नाही, याचेही उत्तर त्यांना पोलिसांना देता आले नाही. सर्वजण उडाउडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे देऊ लागले. 

समर्पक उत्तरे न आल्याने पोलिसांनी त्यांची नावे विचारली. खरी नावे सांगितली जातायत का, याची पोलिसांनीही खात्री करून घेतली. त्यामुळे सर्वांचे चेहऱ्याचे रंग मात्र उडाले होते. सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांनी केलेल्या अपराधाची जाणीव करून दिली. तसेच त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगितले. तसेच या गुन्ह्याच्या प्रकरणात न्यायालयात हजर राहण्याबाबत सहायक फौजदार कोळी यांनी सर्वांना नोटीसही दिली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलचे मालक, व्यवस्थापकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gas Leak: पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती; २४ नागरिकांना त्रास, मोठा अनर्थ टळला!

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT