सातारा

सातारा : स्वत:हून होम आयसोलेशनचा निर्णय आला अंगलट

प्रवीण जाधव

सातारा : कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाला व ग्रामस्तरीय समितीला माहिती न देता आजार लपवून दुसऱ्याच्या घरात लपून बसल्याप्रकरणी गोवे (लिंब, ता. सातारा) येथील एकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:हून होम आयसोलेशन होण्याचा निर्णय संबंधिताच्या अंगलट आला आहे.
कष्टकरी माणसं लय भारी ! 
 
धनंजय सदाशिव जाधव (रा. गोवे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी रमेश बबन ओव्हाळ यांनी फिर्याद दिली आहे. संबंधिताचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबतची कोणीतीही पूर्वसूचना न देता जाधव यांनी गावात प्रवेश केला. 

सातारा जिल्ह्यात नाेकरीची माेठी संधी; नर्स, वॉर्डबॉय, वैद्यकीय अधिकारी हवेत

विलगीकरण कक्षात न जाता तसेच दक्षता समितीला कोणतीही सूचना दिली नाही. स्वत:च्या घरात न राहता नातेवाईकाच्या घरात विलगीकरण करून राहिले. या घरातून मोठमोठ्याने खोकण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी शहानिशा केली. त्यानंतर ही बाब समोर आली. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांनी माहिती घेतली. हवालदार बागवान तपास करत आहेत. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी दहा दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गृहराज्यमंत्र्यांच्या पाटण तालुक्‍यात पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी टंचाई! 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

Latest Marathi News Live Update : श्वान चिकित्सकांच्या अधिवेशनाला मोहन भागवत उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार

Hug Day in Valentine Week : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...; नात्यांना सावरण्यासाठी कधीकधी स्पर्शाची उब हवी असते!

SCROLL FOR NEXT