prithviraj chavhan Sakal
सातारा

Satara : महाआघाडीत बिघाडी अन् भाजपमध्ये फूट

तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली; निवडणूक होणार रंगतदार

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचे येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्यंतर आले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावेळी बिघाडी झाली असून, तालुक्यातील भाजप नेत्यांमध्येही फूट पडली आहे. कऱ्हाड दक्षिणेतील भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली असून, कऱ्हाड उत्तरेतील भाजप नेत्यांनी काँग्रेसला साथ दिली आहे.

तालुक्यात पहिल्यांदाच अशी समीकरणे झाली असून, दोन्ही गटांचे स्थानिक नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल एकत्र आल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी रंगत येऊन चुरसही वाढणार आहे. मात्र, या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे दिसून येते.

राज्यातील मोठी उलाढाल असणारी येथील बाजार समिती आहे. त्याची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी यावेळच्या बाजार समितीच्या निवडणुकीची गणिते बदलणार असल्याचे संकेत गेल्या सहा महिन्यांपूर्वीच मिळाले होते. त्यातच मध्यंतरी झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी झालेल्या घडामोडीवेळी जिल्हा बॅंकेबरोबरच बाजार समिती, जिल्हा परिषद,

पंचायत समितीच्या निवडणुकांच्या समीकरणांची बेरीज करण्यात आली होती. जिल्हा बॅंकेसाठी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील- उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी निवडणूक लढवली. त्या वेळी कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli politics news : 'जयंतराव, विश्वजित कदमांनी विशाल पाटलांचे काँग्रेसचे ‘तिकीट’ कापले', पडळकरांच्या गौप्यस्फोटाने सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

ACB Trap Nagpur Corruption Case : नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयातला मोठा मासा जाळ्यात! 5 लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडलं

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

अटकेच्या दिवशीच खरातची जमीन खरेदी, पत्नी फरार असताना तिच्या नावे व्यवहार पूर्ण; महसूल विभागाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह

Akola News:पुढील दाेन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

SCROLL FOR NEXT