Satara Latest Marathi News 
सातारा

खर्शीत टोकाच्या संघर्षातून तब्बल 60 वर्षांनंतर 'महिलाराज'; सरपंचपदी दुर्गा भिसेंची बिनविरोध निवड

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : तब्बल 60 वर्षांनी निवडणूक बिनविरोध झालेल्या खर्शी तर्फ कुडाळ (ता. जावळी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दुर्गा भिसे व उपसरपंचपदी सारिका भोसले यांची निवडही बिनविरोध झाली. या गावात अनेकदा टोकाचे राजकीय संघर्ष झाल्याने गावच्या भल्यासाठी व सतत होणारा संघर्ष टाळण्यासाठी गावातील सर्व युवक व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली. 

सामान्य कुटुंबातील दुर्गा भिसे यांची सरपंच व उपसरपंचपदी सारिका भोसले यांची बिनविरोध निवड करत गावचा कारभार आता महिलांच्या हाती देण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी रौब शेख, तलाठी अमोल पाटील व ग्रामसेवक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या. या वेळी पोलिस पाटील सुहास भोसले, प्रतापगड कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अंकुशराव शिवणकर, माजी उपसरपंच विठ्ठल शिवणकर, रामचंद्र जाधव, जगन्नाथ शिवणकर, अतुल भोसले, नितीन भोसले, लक्ष्मण भोसले, जयेंद्र भोसले, सचिन साळुंखे, सागर शिवणकर यांच्यासह ग्रामस्थांनी सोपान भोसले, किरण मोरे, राजेंद्र भोसले, कविता साळुंखे, संगीता शिवणकर, मंगल जाधव व आबाजी जाधव या बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार केला. 

या वेळी नूतन सरपंच भिसे यांनी ग्रामस्थांनी महिलांवर विश्वास ठेवताना विकास करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सर्व अंतर्गत गट- तट बाजूला ठेवत गावच्या विकासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असे नूतन सरपंच दुर्गा भिसे यांनी सांगितले. गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करून इतिहास घडविला. आता आम्ही महिलादेखील सर्व सदस्य व ग्रामस्थांना बरोबर घेऊन गाव रोल मॉडल बनवू, असा विश्‍वास उपसरपंच सारिका भोसले यांनी व्यक्त केला. पोलिस पाटील सुहास भोसले यांनी सूत्रसंचालन केले, तर लक्ष्मण भोसले यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT