Satara Latest Marathi News 
सातारा

पृथ्वीराज चव्हाणांचा घात करणारे काय विकास साधणार?; भाजपचे यादवांना चोख प्रत्युत्तर

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा घेऊन पालिकेच्या निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या राजेंद्र यादव यांच्या गटाने तिसऱ्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण यांचा घात करून पलटी मारली. यादव ज्या जनशक्ती आघाडीचे नाव लावतात. त्या आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव यांना त्यांनी कधी पालिकेत बोलवले नाही. केवळ खोट करण्याची परंपरा असलेल्या आणि केवळ टक्केवारीवर आयुष्य चालवणाऱ्यांनी आमची मापे काढू नयेत, अशी टीका पालिकेतील भाजपचे गटनेते ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी केली. 

याप्रसंगी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, फारूक पटेवकर, सुहास जगताप व विद्या पावसकर उपस्थित होते. श्री. पावसकर म्हणाले, ""स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या यादव त्यांच्याच वॉर्डात निवडून येऊ शकले नाहीत. याचेही त्यांनी भान ठेवावे. त्यामुळे यादवांचा विकास म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. अर्थसंकल्पाच्या सभेत उपसूचना जनशक्ती आघाडीने मांडलीच नाही. ती आजतागायत मिळालेली नाही. मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेली नाही. त्यामुळे सूचना मंजूर आहे. 

पहिल्या निवडणुकीपासून राजेंद्र यादव यांना नैतिकता ठेवता आलेली नाही. 1999 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा प्रचार केला. निवडून आल्यानंतर आमच्या सभागृहात सत्कार स्वीकारून तिसऱ्या दिवशी यादव सत्ताधारी (कै.) जयवंत जाधव यांच्या गटाकडे बसले. त्या वेळी नैतिकता कुठे गेली होती. अलीकडच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा घेऊन निवडणुका लढवून त्यांनी बहुमत आणले. मात्र, तुम्हाला लोकांनी नाकारल्याने लगेच तिसऱ्याच दिवशी तुम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा घात करून पलटी मारली.'' 

कऱ्हाड शहरात अतिक्रमणे सुसाट, पालिकेची नेमकी कोणाला साथ?

तुम्हाला लोकांनी नाकारले : नगराध्यक्षा शिंदे 

राजेंद्र यादव यांच्यावर नगराध्यक्षा शिंदे यांनीही टीका केली. त्या म्हणाल्या, ""नैतिकतेचे कारण पुढे करून कायम माझ्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या यादव यांनी मला जनतेने निवडून दिले आहे. त्याचे भान ठेवावे. जनतेने तुम्हाला घरी बसवले आहे. टक्केवारीवर तुम्ही जगता, आम्ही नाही. शहराचा विकास हेच आमचे ध्येय आहे, ते यापुढेही आम्ही कायम ठेवणार आहे.''

Breaking News : प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडेंसह 20 जणांवर खुनाचा गुन्हा 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT