Satara Latest Marathi News 
सातारा

सातारा, सांगलीच्या पालकमंत्र्यांची चुप्पी; कॉंग्रेसच्या एकत्रीकरणाची एकतर्फी चर्चा, राष्ट्रवादीची भूमिकाही गुलदस्त्यात

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते व कॉंग्रेसचे डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रीकरणासाठी कॉंग्रेस आग्रही आहे. त्यावर सातारा व सांगली जिल्ह्यांचे पालकमंत्री व राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील व साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या एकत्रीकरणाची एकतर्फीच चर्चा होत आहे, अशीच सध्याची स्थिती आहे.
 
"कृष्णा'च्या रणांगणात गटबांधणी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना चौकटीत विरोध करण्यापेक्षा व्यापक विचाराने विरोधाच्या भूमिकेसाठी डॉ. इंद्रजित मोहिते अग्रेसर आहेत. त्यासाठी पक्षीय अजेंड्यावर त्यांचा भर आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीशी सोबत करावी, यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदय पाटील- उंडाळकर यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मते मांडली. तसा तालुकानिहाय अजेंडा कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोर ठेवला. कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पलूस, कडेगाव व कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ कॉंग्रेसकडे, तर कऱ्हाड उत्तर, वाळवा, शिराळ्याचा भाग राष्ट्रवादीकडे आहे. तेथील नेत्यांचा त्या भागात प्रभाव आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीच्या बरोबरीने कॉंग्रेसचा प्रभाव आहे, असा दावा डॉ. मोहिते गटाचा आहे. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने बांधणी केली आहे.

आमदार चव्हाण यांच्यासोबत दोन बैठकाही झाल्या आहेत. मंत्री विश्वजित कदम यांच्यासोबत मुंबईला बैठक झाली आहे. आमदार चव्हाण, ऍड. पाटील- उंडाळकर यांच्यासोबत येथे व्यापक बैठक झाली आहे. त्यात आखणी स्पष्ट समोर आली आहे. सत्ताधारी भोसले गट म्हणजे भाजपभोवती चक्रव्यूह आखण्याच्या रणनीतीसाठी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्धार कॉंग्रेसच्या गटाने व्यक्त केला आहे. कॉंग्रेसतर्फे सुरू झालेली कारखान्याच्या एकत्रीकरणाची चर्चा आतापर्यंत एकतर्फी ठरली आहे. 

कॉंग्रेसच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते काहीही बोलण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीचे व संस्थापक पॅनेल नेते अविनाश मोहिते यांना राष्ट्रवादीतून पाठबळ आहे. मात्र, कॉंग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत कोणीच काही बोलण्यास तयार नाही. तो मुद्दाच चर्चेला आलेला नाही. राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार, कॉंग्रेससोबत जायचे की नाही, याचा निर्णय पक्षीय पातळीवर होणार आहे. हा निर्णयही अद्याप गुलदस्त्यात आहे. हा निर्णय घेण्यात राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. अन्यथा कारखाना निवडणुकीत तीन पॅनेल समोरासमोर येतील, अशी स्थिती आहे. 

एकत्रीकरणाची मोहितेंनाच माहिती नाही
 
कृष्णा कारखान्यात अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या गटाच्या एकत्रीकरणाची चर्चा आहे. मात्र, ती केवळ डॉ. मोहिते यांच्या गटाकडून केली जात आहे. त्यासाठी तीन वेगवेगळ्या बैठका झाल्या. मात्र, अद्याप एकाही बैठकीची माहिती संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांना कोणीही दिलेली नाही. त्यामुळे एकत्रीकरणाच्या चर्चा व सगळ्या बैठकांचे नियोजन कॉंग्रेसच्या त्यातही डॉ. मोहिते यांच्या गटातील पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते करत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT