Satara Latest Marathi News 
सातारा

अविनाश मोहितेंना तुरुंगात टाकण्याचे पाप डॉ. सुरेश भोसलेंनी केलं; भारती विद्यापीठाच्या उपाध्यक्षांचा गंभीर आरोप

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : अविनाश मोहिते यांना तुरुंगात टाकण्याचे पाप डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे. ते त्यांना या निवडणुकीत फेडावे लागणार आहे, असा आरोप भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केला. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आघाडी व्हावी, यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. मात्र, अविनाश मोहिते यांची हट्टवादी भूमिका समाजहिताच्या आड येणारी आहे, असे त्यांनी सांगितले. 

वडगाव हवेली येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र जगताप, डॉ. सुधीर जगताप, रामचंद्र भिमराव जगताप, आनंदराव जगताप, माजी सरपंच राजन संदे, संजय पाटील, सतीश पाटील उपस्थित होते. डॉ. मोहिते म्हणाले, "आमचा गट व अविनाश मोहिते गटाच्या आघाडीबाबत अद्याप सकारात्मक चर्चा आहे. आघाडी करताना एकत्रित लक्ष्य पाहिजे. परस्पर विरोधी लक्ष उपयोगाचे नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून निवडणुकीत दोन पावले मागे-पुढे सरकण्याची माझी तयारी आहे. परंतु, अविनाश मोहिते हट्टी आहेत. वेळेवर निर्णय न झाल्याने एकत्रीकरण मावळत चालले आहे. 

डॉ. सुरेश भोसले यांनी सहा वर्षात कडेगाव व खानापूर तालूक्‍यातील 600 सभासदांचे सक्तीने राजीनामे घेतले आहेत. साडेपाच हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. त्या कुरघड्यातून नुरा कुस्ती खेळण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. अविनाश मोहिते यांनी अध्यक्ष असताना अक्रियाशीलतेची पावले उचलली. डॉ. भोसले यांनी त्या प्रक्रियेस गती दिली. प्रक्रियेस संचालक मंडळाच्या बैठकीत प्रोसिडींग कायम करताना अविनाश मोहितेंनी विरोध का केला नाही. त्यामुळे सभासदांच्या अक्रियाशीलतेला सुरेश भोसले व अविनाश मोहिते जबाबदार आहेत. कृष्णा कारखान्यात ऊसाचे गेटकेन आणायचे. सभासदांचा ऊस जयवंत शुगर्सला न्यायचा. हे काय प्रकरण आहे.'' या वेळी आनंदराव जगताप यांचे भाषण झाले. डॉ. सुधीर जगताप यांनी प्रास्ताविक केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

समझो हो गया...! Smriti Mandhana ने एकदम स्टाईलमध्ये दाखवली एंगेजमेंट रिंग! जेमिमा रोड्रिग्सने शेअर केला Video

स्टार प्रवाहला आणखी एक धक्का? 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट? नव्या प्रोमोमुळे चर्चेला उधाण

Pune News : दौंड–इंदापूरमध्ये बनावट मद्याचा भंडाफोड; तीन लाखांचा साठा जप्त; तीन तरुणांना अटक!

SCROLL FOR NEXT