Satara Latest Marathi News 
सातारा

मोहिते गटाच्या एकत्रीकरणासाठी मंत्र्यांची जोरदार फिल्डिंग; माजी मुख्यमंत्र्यांनी सोपवली सतेज पाटील, कदमांवर मोठी जबाबदारी

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व अतुल भोसले यांच्याविरोधात डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते गटांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी, असा कॉंग्रेस जणांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा विचार करून आता थेट माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीच यात लक्ष घातले आहे. त्यांनी दोन्ही मोहितेंना एकत्रित आणण्यासाठी गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता त्यातून काय साध्य होणार हे लवकरच समजेल. 

पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच कॉंग्रेसच्या गटाची बैठक झाली. त्यामध्ये स्वतः श्री. चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी भोसले गटाला पर्यायाने भाजपला या निवडणुकीमध्ये रोखण्यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी बाबांकडे केली. 

दोन्ही गट एकत्र आल्यास मतविभाजन टाळून दोन्ही गटांलाही त्याचा फायदा होईल अन्यथा मतांची विभागणी होऊन दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, अशी स्थिती होईल, असे कार्यकर्त्यांनी त्या बैठकीत पोटतिडकीने मांडले. त्याचा विचार करून आमदार चव्हाण यांनी यामध्ये स्वतः लक्ष घातले आहे. त्यांनी दोन्ही मोहितेंना एकत्रित आणण्यासाठी गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्या दोघांनी दोन्ही मोहितेंचा समन्वय साधून एकाच व्यासपीठावर आणण्याचे धनुष्य कसे पेलले जातंय यावर पुढील लढतीचे चित्र ठरणार आहे. त्यामुळे आता त्यातून काय साध्य होणार याकडे कॉंग्रेस जणांच्या नजरा लागल्या आहेत. 

महाविकास आघाडीचाही पॅटर्न
 
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. यापुढील निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवून तेथील सत्ता ताब्यात घेण्याची तयारी तिन्ही पक्षांनी केली आहे. त्यासंदर्भात मुंबईत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची खलबते झाली आहेत. त्यामुळे आता कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीही तोच फॉर्म्युला वापरून तेथील सत्ता ताब्यात घेण्यासाठी नेत्यांची चर्चा सुरू आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Aadul Rain : आडूळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान

Ambad lightning : अंबड शहरासह परिसरात वादळ, वाऱ्यासह गारा; वीज पडुन दोन युवकांचा मृत्यू

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; तर उर्वरित राज्याला वादळी पावसाचा इशारा

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT