Mahesh Shinde sakal
सातारा

Satara Politics : सत्तेत असताना जनता नाही दिसली; महेश शिंदेंचा शशिकांत शिंदेंना टोला

महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिंदेंनी काल केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिले.

सकाळ वृत्तसेवा

महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिंदेंनी काल केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिले.

सातारा - रामोशवाडीच काय या परिसरातील सगळ्याच भागात ७५ वर्षे टॅंकरने पाणी दिले जातेय. २५ वर्षे त्यांची एकहाती सत्ता होती. दहा वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. जलसंपदामंत्री होता, आज येथे टॅंकर सुरू आहेत. म्हणायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुमचे अपयश जनतेच्या माथी मारताय, असा घाणाघात करून यांची अवस्था शोलेतील आसरानीसारखी झाली आहे. सत्तेत असताना तुम्हाला मतदारसंघातील जनता दिसली नाही. आता आसरानीच्या भूमिकेत जाऊन तुम्ही काहीही करू शकत नाही, असा टोला आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदेंना लगावला.

येथे विश्रामगृहात महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिंदेंनी काल केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिले. महेश शिंदे म्हणाले, ‘‘पोलिस आणि प्रशासनावर दबाव टाकत दिवसा कामे करणारे अधिकारी रात्री चोरासारखी का कामे करत आहेत, असा प्रश्न माजी आमदार करत आहेत. हे सर्व आरोप खोटे असून, मुख्यमंत्र्यांनी चार महिन्यांत सर्वेक्षण करून जिहे- कटापूर योजनेतून या गावांना पाणी उपलब्ध करा, असे सांगितले आहे. हे उपलब्ध पाणी रामोशीवाडीसह ४७ गावांना पोचविण्यासाठी २१० कोटींचे टेंडर खरोटे आणि कंपनीला दिले असून, त्याची वर्क ऑर्डर चार दिवसांत निघेल. कूपनलिकेतून या गावांना पाणी मिळणार आहे. मला चुकीचे राजकारण करून या लोकांना त्रास द्यायचा नाही. मी जनतेला फसवत नाही. सत्य आहे ते सांगून त्यापद्धतीने काम करतोय.’’

तुम्ही सुडाचे राजकारण करताय, असा आरोप शशिकांत शिंदेंनी केला आहे. त्यावर महेश शिंदे म्हणाले, ‘‘त्यांचे राजकारण त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणापुरते मर्यादित होते. त्यांच्या नेत्यांच्या कुटुंबासाठी फायदेशीर होते. आज मी त्यांचे अर्थकारण व त्यांच्या सगळ्या चोऱ्या थांबविल्या आहेत. त्यामुळे त्यांना वाटतंय की मी सुडाचे राजकारण करतोय. जनतेच्या हितासाठी जे करावे लागेल ते करणार आहे. आतापर्यंत खटाव तालुक्यातील दुष्काळ संपवलाय. आता भाडळे खोऱ्यातील दुष्काळ संपवत आहे. रामोशवाडीचाही दुष्काळ महेश शिंदेंच संपविणार आहे.’’

शशिकांत शिंदेंनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर महेश शिंदे म्हणाले, ‘‘त्यांना काय उद्योगच नाही. मध्यंतरी लाठी आंदोलन केले. कुठली माणसे आली होती. एक जण म्हणाला काठी हाणा, दुसरा म्हणाला आत घालतील पळून जावा. यांची अवस्था शोलेतील आसरानीसारखी झाली आहे. आधे इधर, आधे उधर जाओ, बाकी के मेरे पिछे...अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांच्या आंदोलनातून काहीही साध्य होत नाही.’’ कोरेगाव मतदारसंघाच्या विकासावर कधीही कुठल्याही व्यासपीठावर जाहीररीत्या चर्चा करायला तयार आहोत, असे महेश शिंदेंनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT