Satara Politics News  
सातारा

साताऱ्यातील खर्शी गावाने घडविला इतिहास; तब्बल 60 वर्षांनी ग्रामपंचायत बिनविरोध

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : खर्शी तर्फ कुडाळ ग्रामपंचायत निवडणूक तब्बल 60 वर्षांनी बिनविरोध करत गावाने इतिहास घडविला आहे. गावाचा पूर्व इतिहास पाहता या बिनविरोध निवडीचे तालुक्‍यातून कौतुक होत आहे. आदर्श गावात दुफळी माजवणाऱ्या आणि निवडणुकीपुरते उभे राहणाऱ्या स्वयंभू नेत्यांनी या गावाचा आदर्श घ्यावा, असा संदेश या निमित्ताने या गावाने दिला आहे. 

गावाचा इतिहास पाहता या गावात राजकीय संघर्ष अनेकदा टोकाचे झाल्याचे तालुक्‍याने पाहिले आहे. गावात अनेक पक्षांचे कार्यकर्ते आहेत. मात्र, गावाचे भले व्हावे, गावाचा विकास व्हावा व सतत होणारा संघर्ष टाळण्यासाठी गावातील युवक व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करायचीच असा चंग बांधून नऊ जागांसाठी भरण्यात आलेल्या 18 अर्जांपैकी नऊ अर्ज शेवटच्या दिवशी संगनमताने माघारी घेत निवडणूक बिनविरोध करून एक इतिहास घडविला. या वेळी पोलिस पाटील सुहास भोसले, प्रतापगड कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अंकुशराव शिवणकर, अतुल भोसले, नितीन भोसले, विठ्ठल शिवणकर यांच्यासह ग्रामस्थांनी बैठक घेऊन सदस्य म्हणून सोपान भोसले, राजेंद्र भोसले, कविता साळुंखे, सारिका भोसले, किरण मोरे, संगीता शिवणकर, दुर्गा भिसे, मंगल जाधव व प्रभुचीवाडीमधून आबाजी जाधव यांची बिनविरोध निवड केली. 

ग्रामपंचायतीने विकासाच्या दृष्टीने दैनिक सकाळच्या माध्यमातून गाव ई ग्राम करण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून, तसा करार अग्रोटेक इंडस्ट्रीबरोबर केल्याने गावची नाळ जगाशी जोडली जाणार आहे, सर्व अंतर्गत गटतट बाजूला ठेवत गावच्या विकासाठी गाव आता ई ग्राम करताना लगेच निवडणूकही बिनविरोध करण्यात आल्याने आता विकासकामांत देखील गाव मोठी भरारी घेणार आहे. 

खर्शी तर्फ कुडाळ गावाच्या विकासासाठी गावातील सर्व लहानथोर ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करून इतिहास घडवला आहे. भविष्यातही गावामध्ये कोणत्याही पद्धतीने निवडणुका लागणार नाहीत, अशी भूमिका सर्व ग्रामस्थांनी घेतली आहे. 
-सुहास भोसले, पोलिस पाटील, खर्शी तर्फ कुडाळ 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! रक्षाबंधनापासून अंमलबजावणी, राज्य शासनाची अधिसूचना जारी

IND vs SL, Test: भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर! चौथ्या दिवशी फलंदाजी गडबडली, पण गोलंदाजांनी राखले वर्चस्व

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Mangalwedha News : मंगळवेढ्यात धनश्री मल्टीस्टेटने गाठला 1500 कोटी ठेवींचा टप्पा

Junnar elocution competition : जुन्नर येथील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रहिमतपूरचा मिथुन माने सर्वोत्कृष्ट वक्ता

SCROLL FOR NEXT